ठाणे - विरोधाभासातून एकत्र येत सत्ता मिळवली आहे, तर सरकार व्यवस्थित चालवा, असा टोला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'अटलसंध्या' कार्यक्रमात त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यपद्धतीवर टीका केली. यावेळी, 'आता सत्तेत आला आहात; तर किमान मंत्रीमंडळाचा विस्तार करा,' असा टोमणा त्यांनी लगावला.
आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात रंगलेल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्देशून बोलताना, राज्य तुमच्या हाती असून त्याच्या संरक्षणासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले.