महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Deprived of Basic Amenities : आम्हालाही जगण्याचा अधिकार, ठाण्यातील आदिवासी पाड्यांमधील नागरिकांची आर्त - आम्हालाही जगण्याचा अधिकार

भारत देश स्वातंत्र्यांचे 75 वर्षे पूर्ण करत असून एक महासत्ता देश बनण्याकडे वाटचाल करत आहे. नुकतेच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेले अर्थसंकल्प हे भविष्यातील भारत देश डोळ्यासमोर ठेवून सादर केले आहे. मात्र, स्मार्ट सिटी, अशी ओळख असलेल्या ठाण्याच्या एका भागात नागरिकांना मुलभूत सुविधेपासून वंचित रहावे लागत ( Deprived of Basic Amenities ) आहे. आम्हालाही जगण्याचा अधिकार आहे, अशी आर्त हाक ठाण्यातील जांभूळ पाड्यातील नागरिक देत आहेत.

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : Feb 12, 2022, 8:35 PM IST

ठाणे -ठाणे महानगर पालिका क्षेत्रांत असलेल्या संजय गांधी उद्यानात आदिवासी पाड्यांवरील नागरिकांचे आयुष्य देश स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर ही खडतरच आहे. मुलभूत सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध नसल्याने पाणी, रस्ते व वीज मिळावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ( Minister Eknath Shinde ) व गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Minister Jitendra Awhad ) हे दोन दिग्गज मंत्री ठाणे जिल्ह्याचेच असून स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या या जिल्ह्यातील नागरिकांना मुलभूत सुविधेपासूनच वंचित रहावे लागत आहे. आम्हालाही जगण्याचा अधिकार आहे, अशी आर्त हाक देत निदान मुलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

ठाण्यातील आदिवासी पाड्यांमधील नागरिकांची आर्त

दुषित पाणी पिल्याने अनेक आजार - धक्कादायक बाब म्हणजे येथील नागरिक एका पावसाळ्यात नाल्याशेजारी खड्डा खोदून त्या खड्ड्यात साठलेल्या दूषित पाण्याचा वापर करतात. यासोबतच रस्ते, पथदिवे व मलनिस्सारण व्यवस्था या सारख्या मूलभूत सुविधा नसल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. दूषित पाणी पिल्याने हे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. नेतेमंडळी फक्त मतदानाच्या वेळी मत मागण्यासाठी हात जोडत येतात. मात्र, त्यानंतर एकदाही फिरकत नसल्याचा गंभीर आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

मंत्री येताना होतात रस्ते -या भागात रस्ते कितीही खराब झाले तरी कोणी लक्ष देत नाही. मात्र, काही बड्या लोकांच्या लग्न समारंभासाठी जर मंत्री नेते येणार असतील तर येथे डांबरीकरण होते, अशी माहिती या राहिवाशांनी दिली आहे. एवढेच नाही तर येथून निवडून दिलेले नगरसेवक 5 वर्षे बघायला देखील येत नसल्याचे नागरिक सांगत आहेत.

8 पाडे दुर्लक्षित -पिण्याचे पाणी ही परिस्थिती एकट्या जांभूळ पाड्याची नाही तर अशा आठ पाड्यांची समस्या आहे. या आठही पाड्यांवरील लोक अशा नरक यातना भोगत आहेत. पावसाळ्यात रस्ते नसतात, मग रुग्ण तसेच गर्भवती महिलांना खांद्यावर घेऊन जाऊन शहरात रुग्णालय गाठावे लागत असल्याचे नागरिक सांगत आहेत.

हेही वाचा -Traffic Park In Thane : ठाण्यातील ट्राफिक पार्क झाले खासगी संस्थांच्या उत्पन्नाचे साधन

ABOUT THE AUTHOR

...view details