महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महिला प्रसाधनगृहातील सॅनिटरी नॅपकीन मशीन नादुरुस्त; कोट्यवधीचा निधी वाया - सॅनिटरी नॅपकीन मशीन

कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाच्या वतीने महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशीन आणि डिसक्लोज मशीन बसवण्यात आल्या होत्या. मात्र काही कालावधीतच त्या मशीनची दुरावस्था झाल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे.

sanitary napkin machine
sanitary napkin machine

By

Published : Oct 28, 2021, 11:39 PM IST

Updated : Oct 28, 2021, 11:53 PM IST

ठाणे - महिलांच्या मासिकपाळी दरम्यान होणारी कुचंबणा लक्षात घेता सरकारी कार्यालये तसेच सार्वजनिक महिला प्रसाधन गृहात ठिकठिकाणी मोठा गाजावाजा करत कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाच्या वतीने महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशीन आणि डिसक्लोज मशीन बसवण्यात आल्या होत्या. मात्र काही कालावधीतच त्या मशीनची दुरावस्था झाल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे.

महिला प्रसाधनगृहातील सॅनिटरी नॅपकीन मशीन नादुरुस्त;
विविध ठिकाणी 175 सॅनिटरी नॅपकीन मशीन..

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त गोविदा बोडके यांच्याकडे महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन संदर्भात लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती. त्यांनतर महिला बालकल्याण समितीने पुढाकार घेत स्थायी समितीमध्ये एक कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. त्यानंतर ठेकेदारांमार्फत कल्याण डोंबिवली हद्दीतील शाळा व सरकारी कार्यालये, नागरी सुविधा केंद्र अशा वेगवेगळ्या ठिकाणी महिला प्रसाधनगृहात 175 सॅनिटरी नॅपकीन मशीन बसवल्या होत्या. मात्र या सॅनिटरी नॅपकीन मशीनच्या देखभाल दुरुस्तीकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे महापालिका अधिकाऱ्यांचे ठेकेदारांवर नियंत्रण नसल्याची बाब या निमित्ताने उघडकीस आली आहे

हे ही वाचा -Aryan Khan Drug Case : अखेर आर्यनला जामीन; 'मन्नत'बाहेर फटाके फोडून सेलिब्रेशन

Last Updated : Oct 28, 2021, 11:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details