महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊन काळात घरफोडीच्या गुन्ह्यात घट - घरफोडीच्या गुन्ह्यात घट

गेल्या वर्षांच्या तुलनेत म्हणजे जानेवारी 2019 ते डिसेंबर 2019 पर्यत या कालावधीत 964 घरफोडीचे गुन्हे घडले होते. त्यापैकी 384 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले होते. मागील वर्षाच्या गुन्ह्यांच्या तुलनेत यावर्षी गुन्ह्यांचे प्रमाण बर्‍यापैकी घटले असल्याचे दिसून आले आहे.

घरफोडीच्या गुन्ह्यात घट
घरफोडीच्या गुन्ह्यात घट

By

Published : Apr 9, 2021, 7:10 PM IST

ठाणे - जिल्हा पोलीस आयुक्त क्षेत्रात 5 पोलीस परिमंडळ असून यामध्ये एकूण 35 पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. त्यातच गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन लागल्यामुळे अनेक गंभीर गुन्हे होण्याचे प्रमाण घटले आहे. मात्र, जिल्ह्यातील शहरी भागात 641 घरफोडीचे गुन्हे विविध पोलिस ठाण्याच्या नोंदीवरून समोर आले आहे. मात्र केवळ 44 टक्के घरफोड्याच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. 280 घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास केला असल्याचे पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे घरफोड्या करणाऱ्या चोरटे पोलिसांच्या तावडीत अजूनही सापडले नसल्याने पोलिसांना या अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करावी लागेल, असे पोलीसांकडून सांगितले आहे.

ठाणे पोलीस
लॉकडाऊनमुळे घरफोड्यांच्या गुन्ह्याला आळा

लॉकडाऊनमुळे देशाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असले तरी त्याचा सकारात्मक परिणाम 2020 मध्ये दिसून आला. या वर्षात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचे प्रमाण घटले असल्याचे दिसून आले. मात्र, गेल्या वर्षांच्या तुलनेत म्हणजे जानेवारी 2019 ते डिसेंबर 2019 पर्यत या कालावधीत 964 घरफोडीचे गुन्हे घडले होते. त्यापैकी 384 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले होते. मागील वर्षाच्या गुन्ह्यांच्या तुलनेत यावर्षी गुन्ह्यांचे प्रमाण बर्‍यापैकी घटले असल्याचे दिसून आले आहे.

कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीने नागरिक घरातच
लॉकडाऊनच्या कालावधीत बहूतांश नागरिक घरीच राहत होते. तसेच पोलीस विभागाचे कर्मचारी टाळेबंदीची अंमलबजावणी करण्यात व्यस्त राहत होते. त्याच बरोबर घराबाहेर पडल्यास कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असल्याने नागरिक सहजासहजी घराबाहेर पडत नव्हते. उन्हाळ्याच्या कालावधीत मुलांना सुट्ट्या असल्याने काही नागरिक फिरण्यासाठी जातात, या संधीचा गैरफायदा उचलून उन्हाळ्यामध्ये घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होते. गेल्या वर्षी मात्र नागरिक घरीच असल्याने घरफोडीच्या घटनांमध्ये घट झाली असल्याचे दिसून येते आहे.


दिवसापेक्षा रात्रीच्या घरफोड्याचे प्रमाण अधिक
ठाणे पोलीस आयुक्त कार्यालय क्षेत्रात शहरी भाग मोठ्या प्रमाणात असून यामध्ये पाच पोलिस उपायुक्त परिमंडळ कार्यालय आहेत. तरीही सुमारे 78 घरफोडीचे गुन्हे दिवसा घडले असून यापैकी 22 गुन्हे याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र रात्रीच्या घरफोडीच्या गुन्ह्याचे प्रमाण अधिक असून 563 गुन्हे रात्रीच्या अंधारात घडले आहेत. तर या गुन्ह्यांपैकी 258 गुन्हे उघडकीस आणले असले तरी घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात अत्यंत कमी यश पोलिसांना मिळाल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा-वाईजवळ लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सहा जण ताब्यात

ABOUT THE AUTHOR

...view details