महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंब्रा- कौसा भागातील 69 शाळांचे 3 महिन्यांचे शुल्क माफ, पालकांना दिलासा - Thane School News

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पाठपुराव्यामुळे ठाणे परिसरातील तब्बल 69 शाळांनी तीन महिन्यांचे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरोना संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Decision to waive schools fees, thane
69 शाळांचा शुल्क माफ करण्याचा निर्णय

By

Published : Nov 10, 2020, 9:59 PM IST

ठाणे -लॉकडाऊनच्या काळात पालकांचे आर्थिक स्त्रोत खंडीत झाल्यामुळे शाळांचे शुल्क माफ करण्याची मागणी करण्यात येत होती. यावर तोडगा काढण्यासाठी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार मुंब्रा कौसा एज्युकेशन फी सॉल्युशन कमिटी स्थापन करण्यात आली होती. या समितीने केलेल्या पाठपुराव्यामुळे सुमारे 69 शाळांनी तीन महिन्यांचे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा- मुंब्रा विधानसभा क्षेत्राध्यक्ष शमीम खान यांनी दिली.

69 शाळांचा शुल्क माफ करण्याचा निर्णय

विद्यार्थ्यांचे पालक आर्थिक विवंचनेत असल्याने शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात होती. त्यामुळे आव्हाड यांनी ही समस्या मार्गी लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ऋता आव्हाड, सय्यद अली अशरफ, शमीम खान, अशरफ शानू पठाण, शादाब खान, रफिक कामदार यांच्या सदस्यतेखाली मुंब्रा कौसा एज्युकेशन फी सॉल्युशन कमिटी स्थापन करण्यात आली. या सर्व सदस्यांनी शाळा-कॉलेजांना भेटी देऊन शुल्क माफ करण्याची विनंती केली होती. त्यानुसार, सुमारे 69 शाळांनी तीन महिन्यांचे शैक्षणिक शुल्क तसेच इतर शुल्क माफ करण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष कार्यालय तसेच संघर्ष या संस्थेच्या माध्यमातून शिष्यवृत्तीसाठी शिबिराचेही आयोजन केले होते. या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्री मैट्रिक स्कॉलरशिप, पोस्ट मैट्रिक स्कॉलरशिप बाबत मार्गदर्शन करण्यात आले. सुमारे 9 हजार 182 विद्यार्थी या शिबिरामध्ये सहभागी झाले होते. त्यापैकी 7 हजार 146 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी अर्ज केले आहेत. तसेच, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी बेगम हजरत महल नॅशनल स्कॉलरशिपदेखील सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती शमीम खान यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details