ठाणेDeath Of Worker: कामगार डाईंग मशीनवर काम करत असताना त्याचा हात रोलर मशीनमध्ये अडकल्याने तो कपड्यासह रोलर (Death by Stuck in Machine) मशीनमध्ये खेचला गेल्याने गंभीर जखमी झाला. यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. (Khemesati Company) ही खळबळजनक घटना भिवंडी तालुक्यातील शेलार गावच्या हद्दीत असलेल्या खेमीसती नावाच्या कंपनीत घडली आहे. (Bhiwandi Taluka) याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात येऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अजय नरेश मिश्रा (वय २४, रा.शेलार, भिवंडी) असे मशीनमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. (Cloth Dyeing Company)
हात अडकल्याने घडला अपघात:पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक अजय हा कामगार भिवंडी तालुक्यातील शेलार गावात असलेल्या खेमीसती या कपडा डाईंग कंपनीत कामाला होता. त्यातच नेहमीप्रमाणे शुक्रवारी पहाटे पावणे दोन वाजल्याच्या सुमारास मृतक अजय हा त्याचा सहकारी कामगार सुनील राम चौथीराम हे दोघे डाईंगमध्ये कपडा रोल करण्याच्या डेका मशीनवर काम करीत होते. त्यावेळी मृत अजय हा कपडा रोल करण्यासाठी रोलर मशीनमध्ये हाताने टाकत होता. त्याच सुमारास अचानक रोलर मशीनमध्ये त्याचा हात अडकल्याने तो कपड्यासह मशीनमध्ये जाऊन संपूर्ण रोल झाला.