ठाणे - एका घराची भिंत कोसळून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची, घटना रविवारी दुपारी घडली आहे. ही घटना भिवंडी शहरातील गायत्रीनगर परिसरातील रामनगर येथे घडली आहे.अरविंद सिंग ( वय ४५ ) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. या घटनेने परिसरातील लोक चांगलेच घाबरले आहेत.
विश्रांती घेण्यासाठी झोपला 'तो' उठलाच नाही
भिवंडी शहरातील रामनगर येथे एका इमारतीच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम सुरू होते. दरम्यान. रविवारी दुपारी भिवंडी ग्रामीणमध्ये मुसळधार पाऊस झाला. या पावसातच बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत कोसळली. ही भिंत इमारतीच्या बाजूला असलेल्या चाळीवर कोसळली. या चाळीच्या खोलीत अरविंद सिंग हे झोपलेले होते. ही भिंत अरविंद याच्या अंगावर कोसळल्याने सिंग यांचा जागीच मृत्यू झाला.
भिवंडीत इमारतीची भिंत कोसळून कामगाराचा मृत्यू शहरात अनधिकृत बांधकामे जोमात या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मनपाच्या आपत्ती विभागासह अग्निशामक दल, पोलीस दाखल झाले. सध्या महापालिकेच्यावतीने या इमारतीला तोडण्याचे काम सुरू आहे. या इमारतीसह भिवंडी शहरात अनधिकृत बांधकामांवर मनपा आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, अशा प्रकारचे अनधिकृत बांधकामे शहरात सुरूच आहेत. आता या इमारत मालकावर मनपा नेमकी काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.