महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 18, 2019, 11:09 PM IST

ETV Bharat / state

व्यापाऱ्याने उल्हास नदीत फेकल्या मृत कोंबड्या; पुरानंतर नद्यांना प्रदूषणाचा विळखा

जिल्ह्यातील नद्या आधीपासून प्रदूषित असताना पुरात वाहून आलेल्या हजारो टन कचऱ्याची भर पडल्याने 9 नद्यांच्या जल प्रदूषणात वाढ झाली आहे. यातच मृत कोंबड्या नदीत फेकण्याचा प्रकार घडल्याने स्थानिक जिल्हा प्रशासन तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मृत कोंबड्या नदीत फेकण्याचा प्रकार घडल्याने स्थानिक जिल्हा प्रशासन तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

ठाणे - जिल्ह्यातील नद्या आधीपासून प्रदूषित असताना पुरात वाहून आलेल्या हजारो टन कचऱ्याची भर पडल्याने 9 नद्यांच्या जल प्रदूषणात वाढ झाली आहे.

यातच मृत कोंबड्या नदीत फेकण्याचा प्रकार घडला आहे. बदलापूर पश्चिम भागात 4 ऑगस्टला पूर आला होता. पूर ओसरल्यानंतर बदलापूर परिसरातील एका कोंबडी व्यापाऱ्याने कोंबड्यांनी भरलेले दोन टेम्पो शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या किनारी लावून त्यामधील शेकडो मृत कोंबड्या नदीच्या वाहत्या पाण्यात टाकल्या. या मृत कोंबड्या नदीत फेकतानाचे चित्रीकरण एका नागरिकाने केले. यानंतर संबंधित व्यक्ती व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

मृत कोंबड्या नदीत फेकण्याचा प्रकार घडल्याने स्थानिक जिल्हा प्रशासन तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

काही दिवसांपूर्वी दोन ग्रामपंचायतींच्या घंटागाड्यांमधून नद्यांना आलेल्या पुरात कचरा टाकल्याचा प्रकार घडला होता. या दोन्ही घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणाची दखल घेऊन, ठाणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी. बी. नेमाणे यांनी भिवंडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यशवंत म्हापसे यांसह घंटागाडी चालक सुनील चन्ने व सफाई कर्मचारी समीर जाधव यांना निलंबीत केले होते. मात्र, यानंतर दुसऱ्याच दिवशी अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कचरा उचलणाऱ्या घंटागाडी चालकानेही नदीपात्रात कचरा फेकण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला.

दुसऱ्या ग्रामपंचायतीमधील तसेच मेलेल्या कोंबड्या नदीत फेकणार्‍यांविरोधात अद्यापही कारवाई करण्यात आली नसल्याने स्थानिक जिल्हा प्रशासन तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details