महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दाऊदचा भाऊ इकबाल कासकर उपचारासाठी ठाणे रुग्णालयात - दाऊदचा भाऊ इकबाल कासकर

इकबाल कासकर हा अनेक आजारांनी त्रस्त आहे. त्यामुळे त्याला जेजे किंवा सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र, त्याला सिव्हिल रुग्णालयात आणल्याचा आरोप त्याच्या वकिलानी केला आहे.

दाऊदचा भाऊ ईकबाल कासकर

By

Published : Jun 7, 2019, 1:39 PM IST

ठाणे - दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर खंडणी प्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत.

इकबाल कासकर हा अनेक आजारांनी त्रस्त आहे. त्यामुळे त्याला जेजे किंवा सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र, त्याला सिव्हिल रुग्णालयात आणल्याचा आरोप त्याच्या वकिलानी केला आहे.

ईकबाल कासकरला का केली होती अटक?

गेल्या १८ एप्रिल २०१७ ला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला खंडणीच्या प्रकरणात ठाणे गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या होत्या. पुन्हा पोलीस सेवेत दाखल झालेले आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली होती.

एका बिल्डरला इक्बाल कासकर खंडणीसाठी धमकावत असल्याची तक्रार ठाणे पोलिसांकडे आली होती. याप्रकरणी चौकशीसाठी इक्बालला बोलावण्यात आले होते. त्यात त्याच्याकडून ठोस उत्तरे न मिळाले नव्हती. तसेच पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावेही लागले होते. त्यामुळे चौकशीनंतर इक्बालला अटक केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details