महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Daughter in law molestation Case: सुनेशी लगट करत सासरा करायचा विनयभंग, तर पतीचेही परस्त्रीशी संबध, पीडितेची पोलिसात धाव - सुनेचे विनयभंग प्रकरण

Daughter in law molestation Case: ठाणे येथील एका हायफ्रोफाईल सोसायटीत राहणाऱ्या २६ वर्षीय सुनेशी सासरा लगट करत तिचा वारंवार विनयभंग (Daughter in law molested by father in law) करीत होता. तर पतीचेही परस्त्रीशी संबध पाहून पीडित विवाहितेने पोलिसात तक्रार केली. (victim complains to police) या तक्रारीच्या आधारे डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात आरोपी सासऱ्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे.

Daughter in law molestation Case
सुनेचा विनयभंग

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2023, 10:46 PM IST

ठाणेDaughter in law molestation Case: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय पीडितेचा विवाह मार्च २०१७ मध्ये झाला होता. पीडिता डोंबिवलीत सासरी आल्यापासून सासरा तिचा वारंवार लैंगिक छळ, विनयभंग करत असल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. (husband relationship with another woman) तो सुनेकडे वाईट नजरेने पाहत होता. सून बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली की, तो बाहेर फेऱ्या मारायचा. शिवाय वाहन शिकवण्याच्या बहाण्याने सुनेशी अश्लिल चाळे करून तिचा विनयभंग करायचा. सुनेने वेळोवेळी यावर आक्षेप घेतला. मात्र, सासऱ्याने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. (father in law arrested)

सासऱ्याने दिली सुनेला धमकी:सोसायटीच्या लिप्ट मधून पीडिता जाताना सासरा अनेकदा तिच्याशी लगट करून तिचा विनयभंग करीत होता. मात्र, बदनामीच्या भीतीमुळे पीडिता गप्प राहिली. त्यातच पीडितेने काही महिन्यांनी एका मुलाला जन्म दिला. यावेळी आरोपी सासऱ्याने सुनेला धमकावले होते. यानंतर तो पीडितेच्या व्हाॅट्सपवर अश्लिल मॅसेज पाठवून तिला मानसिक त्रास देत होता. सासरा करत असलेल्या कृत्याबाबत पीडितेने पतीला सांगितले. पण, त्याने याविषयी परत न बोलण्याचे सांगून या विषयाकडे दुर्लक्ष केले होते, असे पीडित सुनेने तक्रारीत म्हटले आहे.

सुनेला दिली लज्जास्पद ऑफर:सासऱ्याची हिंमत वाढल्याने त्याने एके दिवशी सुनेला अनुचित ऑफर दिली. तर १२ ऑक्टोबर रोजी पीडितेने तिच्या पतीच्या मोबाईलवर एका तरुणीने पाठविलेले अश्लिल मॅसेज पाहिले. ते मॅसेज पीडितेने स्वत:च्या मोबाईलमध्ये उतरून घेतले होते. आरोपी सासरा आणि पतीचे प्रकार पाहिल्यानंतर सासरी राहणे धोक्याचे आहे, असा विचार करून पीडितेने आपल्या मामा, मामीला घरी बोलावून घेतले आणि सासरा व पतीचे कुकृत्य सांगितले. त्यावेळी आरोपी सासऱ्याने पीडित सुनेच्या हातामधील मोबाईल हिसकावून फोडून टाकला, असे तिने रामनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

आरोपी सासऱ्यास अटक:या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्याशी संपर्क साधला असता गुन्हा दाखल असलेला सासरा हा प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक असल्याचे सांगितले. सुनेच्या तक्रारीवरून आरोपी सासऱ्यास अटक करण्यात आली आहे. पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करीत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details