ठाणे - टिटवाळा स्थानकातील ४० वर्ष जुना जीर्ण प्रवासी पूल सोमवारपासून कायमस्वरुपी बंद करण्यात येणार आहे. विविध रेल्वे प्रवासी संघटनांनी हा पूल बंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला.
टिटवाळा रेल्वे स्थानकातील धोकादायक पादचारी पूल सोमवारपासून बंद हेही वाचा - 'जास्त नाटकं कराल तर दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल'
टिटवाळामधील रेल्वे प्रवाशांना पूर्व आणि पश्चिमेला जाण्यासाठी हा एकमेव पादचारी पूल आहे. अचानक गर्दी वाढल्यास यातून फार मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता होती. रेल्वे प्रवासी संघटना, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधींनी वारंवार ही बाब रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आणुन दिली होती.
हेही वाचा - कोरोना विषाणू : आई-मुलीचा भावूक क्षण, हवेत मारली मिठी
दरम्यान, या स्थानकातील नवीन पूल नुकताच पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात आला आहे. या पुलामध्ये अनेक तृटी असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. हा पूल अरुंद असून गर्दी वाढल्यास चेंगराचेंगरी होऊ शकते, अशी भीती प्रवाशांनी व्यक्त केली. या नवीन पुलावर तिकीट खिडकीसह इंडिकेटर, लिफ्ट बसवण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. एक आणि दोन नंबर प्लॅटफॉर्मवर उतरणारा जिना हा मोटरमनच्या डब्याजवळ न उतरविता महिला डब्याजवळ उतरविण्यात यावा, अशी मागणीही स्थानिक करत आहेत.