ठाणे - कल्याण तालुक्यातील उल्हास नदीच्या काठावर वसलेल्या 10 गावातील ग्रामस्थ व तरुणांना रस्त्याच्या अभावामुळे आजही जीवघेणा प्रवास ( Dangerous Journey of Villagers ) करावा लागत आहे. यामुळे या भागातील नागरिकांनी अनेकादा लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे या ठिकाणी पूल बांधण्याची मागणी केली मात्र अद्याप याठिकाणी पुलाचे काम झालेले नाही, त्यामुळे प्रत्येकाला आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. लवकर प्रशासनाने गावकऱ्यांच्या प्रश्नाची दखल घेऊन या ठिकाणी पूल बांधावा अशी मागणी गावकऱ्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केली.
येण्याजाण्यासाठी बांधलेली पायवाट गेली वाहून -
उल्हास नदीच्या काठावर आपटी गाव वसलेले आहे. शेती हाच गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय होता. परंतु अंबरनाथ, बदलापूर येथे एमआयडीसी झाल्याने आजूबाजूच्या आपटी, बारे, चोण, मांजर्ली, दहागाव, वाहोली, कुंभारपाडा, बांधणेपाडा आदी 10 गावातील तरुण रोजगारासाठी दुसऱ्या शहरात जाताना उल्हास नदीतून प्रवास करीत होते. त्यातच उल्हास व बारवी नदीचा संगम नजीक जांभूळ एमआयडीसीने येथे पाणसाठवण बंधारा बांधला आहे. त्यातच वाढणारी लोकसंख्या आणि नव्याने वसलेल्या शहरांना पाणीपुरवठा कमी पडू लागल्याने एमआयडीसीने आपटी बंधाऱ्याच्या उंची वाढविली, तसेच बंधाऱ्याच्या खाली आपटी जांभूळ वसद, आदी गावातील गावकऱ्यांना येण्याजाण्यासाठी एक ते दिड मिटर रुंंदीची साधारण 500 मीटर लांबीची पायवाट बनवून दिली होती. येथूनच गावकऱ्यांची ये जा सुरू होती. परंतु मागील एक दोन वर्षांपूर्वी आलेल्या पुरामुळे या पायवाटेचा काही भाग वाहून गेला आहे.
जीवमुठीत घेऊन प्रवास -