महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर; अडीच लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे वास्तव्य - धोकादायक इमारती

शहरात नेमक्या किती धोकादायक इमारती आहेत? तसेच या धोकादायक इमारतींमध्ये किती कुटुंबीयांचे वास्तव्य आहे? याची माहिती घेण्यासाठी ठाणे महापालिकेने मे महिन्यात सर्व्हेक्षण केले होते. यामध्ये ४ हजार ५०७ इमारती या संपूर्ण शहरात धोकायदाक असल्याचे समोर आले आहे.

धोकादायक इमारती

By

Published : Jun 26, 2019, 8:01 AM IST

Updated : Jun 26, 2019, 10:24 AM IST

ठाणे- शहरात पुन्हा एकदा धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठाणे महापालिकेने धोकादायक इमारतींचे मान्सूनपूर्व सर्व्हेक्षण केले आहे. त्यानुसार तब्बल अडीच हजार लाखांपेक्षा अधिक नागरिक धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करीत असल्याचे उघड झाले आहे. एकूण लोकसंख्येच्या १० टक्के नागरिक या इमारतींमध्ये राहत आहेत, तर गेल्यावर्षीच्या तुलनेत ही संख्या कमी आहे.

धोकादायक इमारतींबद्दल बोलताना परिसरातील नागरिक

शहरात नेमक्या किती धोकादायक इमारती आहेत? तसेच या धोकादायक इमारतींमध्ये किती कुटुंबीयांचे वास्तव्य आहे? याची माहिती घेण्यासाठी ठाणे महापालिकेने मे महिन्यात सर्व्हेक्षण केले होते. यामध्ये ४ हजार ५०७ इमारती या संपूर्ण शहरात धोकायदाक असल्याचे समोर आले आहे. यापैकी जवळपास २०० इमारती या राहण्यास अत्यंत धोकादायक आहेत. या इमारतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबीयांची संख्या ५६ हजार ५२२ आहे. म्हणजेच अद्यापही अडीच लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे वास्तव्य धोकादायक इमारतींमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी नागरिकांना क्लस्टर योजनेमध्ये सामावून घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

शहरातील ४ हजार ५०७ धोकादायक इमारतींमध्ये ३ हजार ९९८ इमारती या अनधिकृत आहेत. केवळ ५०९ धोकादायक इमारती या अधिकृत असल्याचे या सर्व्हेमधून समोर आले आहे. विशेष करून दिवा, मुंब्रा आणि कळवा भागात धोकादायक इमारतींचे प्रमाण जास्त आहे. तसेच याठिकाणी कुटुंबीयांची संख्या देखील जास्त आहे. ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने एका महिन्यात १२२ धोकादायक इमारती रिकाम्या करण्यात आल्या. 'सी १' या धोकादायक श्रेणीत असलेल्या १०३ इमारतींमधील ९१ इमारती या रिकाम्या करण्यात आलेल्या आहेत, तर १२ इमारती तोडण्यात आल्या आहेत. 'सी २ ए' श्रेणीमधील ९८ इमारती आहेत, तर 'सी २ बी'मध्ये २ हजार २९७ इमारती आहेत. या दोन्ही श्रेणीतील इमारतींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. 'सी ३' श्रेणीमध्ये २००९ इमारती असून त्यांची किरकोळ दुरुस्ती करावी लागणार आहे. काही इमारती अद्यापही रिकाम्या करण्याचे काम सुरू असल्याचे अतिक्रमण विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

अधिकृत धोकादायक इमारतींची संख्या - ५०९
अनधिकृत धोकादायक इमारतींची संख्या - ३ हजार ९९८

काय आहे धोकादायक इमारतींच्या श्रेणी -

  1. सी १ - या श्रेणीमधील इमारती अतिधोकादायक असून त्या राहण्यास योग्य नसतात. अशा इमारती तोडण्यात येतात. सध्या या इमारतींची संख्या १०३ आहे.
  2. सी २ ए - या इमारती दुरुस्त करण्यायोग्य असतात. दुरुस्ती झाल्यानंतर यामध्ये नागरिक पुन्हा वास्तव्य करू शकतात. अशा ९८ इमारती आहेत.
  3. सी २ बी - यामध्ये नागरिक वास्त्यव्य करीत असताना इमारतींची दुरुस्ती केली जाते. अशा २ हजार २९७ इमारती आहेत.
  4. सी ३ - या श्रेणीमध्ये इमारतींना किरकोळ दुरुस्तीची गरज असते. अशा एकूण २००९ इमारती आहेत.
Last Updated : Jun 26, 2019, 10:24 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details