ठाणे -शहरातील ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक विभागात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी 'गोविंदा आला, गोपाळ आला... आजचा सण गोपाळकाला' या गाण्यावर बालगोपालांसह शिक्षकांनी ठेका धरला.
ठाण्यात ब्राह्मण विद्यालयात बालगोपालांचा दहीहंडी उत्सव साजरा - दहीहंडी उत्सव
ठाण्यातील ब्राह्मण विद्यालयामध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बालगोपालांनी गोविंदा आला...गोपाळ आला...म्हणत दहींहडी फोडली.
ठाण्यात ब्राह्मण विद्यालयात बालगोपालांचा दहीहंडी उत्सव साजरा
कृष्णा जन्माष्टमीचा उत्सवासोबतच शुक्रवारी गोपाळकाला उत्सव देखील साजरा करण्यात आला. यावेळी शाळेत बालगोपाल राधा-कृष्णाची वेशभूषा परिधान करून आले होते. तसेच यावेळी सर्वांनी दहीहंडी फोडली. महाराष्ट्रातील प्रत्येक शाळांमध्ये माध्यम कोणतेही असो दिपपूजा, राखीपौर्णिमा, गोकुळाष्टमी यांसारखे सण मोठ्या प्रमाणावर साजरे झाले पाहिजे, असे मत पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रोहिणी दिवाण यांनी यावेळी व्यक्त केले.
Last Updated : Aug 24, 2019, 9:37 AM IST