महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यातील चिराग शहाला 'सायकलिंग महापौर' किताब जाहीर - ठाणे न्यूज

आज जागतिक सायकलिंग दिन आहे. यानिमित्ताने ठाण्यातील चिराग शहा याला "First cycling mayor of thane" हा 'किताब जाहिर करण्यात आला आहे.

thane
ठाणे

By

Published : Jun 3, 2021, 8:57 PM IST

ठाणे - जगभरातील सायकल प्रेमींसाठी आजचा दिवस खूप विशेष आहे. कारण आज (3 जून) जागतिक सायकलिंग दिन आहे. परंतु, ठाण्याच्या चिराग शहासाठी आजचा दिवस खूप आनंददायी ठरला आहे. जागतिक स्तरावर सायकलिंगच्या प्रसारासाठी काम करणाऱ्या BYCS या ऑस्ट्रेलियाच्या अ‌ॅमस्टरडॅम येथील NGOने ठाण्याच्या चिराग शहाला "First cycling mayor of thane" हा 'किताब जाहीर केला आहे. या निमित्ताने ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी चिरागचे अभिनंदन केले आहे.

ठाण्यातील चिराग शहाला 'सायकलिंग महापौर' किताब जाहीर

'ठाण्याला देशाची सायकलिंग राजधानी बनवूया'

'सायकल चालवल्याने शरीर सुदृढ राहतेच. परंतु सायकलमुळे कोणत्याही प्रकारची पर्यावरण हानी होत नाही. ठाण्यातील जास्तीत जास्त लोकांनी सायकल चालवली पाहिजे. आपण सर्वांनी एकत्र येऊन ठाण्याला देशाची सायकलिंग राजधानी बनवण्याचा विडा उचलला पाहिजे', असे महापौर म्हस्के यांनी म्हटले आहे.

'मेहनतीचे फळ मिळाले, सगळ्यांनी सायकल वापरा'

'आपल्याला मिळालेल्या पुरस्काराने एवढे दिवस केलेल्या मेहनतीचे चीज झाले. मी दररोज 8 ते 10 किलोमीटर सायकल चालवतो. सगळ्यांनीच पेट्रोल-डिझेल जाळून धूर करणाऱ्या गाड्या न वापरता पर्यावरण पूरक सायकल वापरावी. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. त्याने मनुष्याला आर्थिक आणि शारीरिक हानी पोहोचत आहे. त्यामुळे किमान छोट्या अंतरासाठी तरी सर्वांनी सायकलचा वापर करावा', असे आवाहन चिरागाने केले आहे.

हेही वाचा -राज्य सरकारने 12वीची परीक्षा रद्द केल्यानंतर काय आहेत विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया, जाणून घ्या...

ABOUT THE AUTHOR

...view details