शासनमान्य मानांकित प्रमाणपत्र विक्रेत्यांनकडून आंब्याची खरेदी करा ठाणे:आंबे खवय्यांना देवगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या चार जिल्ह्यांतील उत्तम प्रतीच्या सुवासिक हापूस आंब्याचा आस्वाद घ्यायचा असतो. तर देवगड आंबा सहकारी खरेदी विक्री संस्थेच्या माध्यमातून अधिकृत आंबे विक्रेत्यांना शासनमान्य मानांकित प्रमाणपत्र मिळाले आहे. अशाच ठिकाणी ग्राहकांना आंबे करण्याचे आवाहन आंबा अभ्यासक सिताराम राणे यांनी केले आहे. रस्त्याच्या कडेला विक्रीसाठी बसणारे फेरीवाले यांच्याकडे शासनमान्य आंबा विक्रीचे प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले.
यंदा आंब्याचे उत्पादन कमी: यंदा अवकाळी पावसामुळे आंब्याला आलेला मोहर गळून पडला आहे. महाराष्ट्रामध्ये आंब्याचे उत्पादन कमी झालेला असताना राज्य बाहेरून येणाऱ्या आंब्याची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. हे आंबे महाराष्ट्रातल्या आंब्यांच्या नावांनीच विक्री होत आहेत. बाजारात मोठ्या प्रमाणावर हापूस आंब्याच्या नावाखाली ग्राहकांची सर्रासपणे फसवणूक होत आहे. तर हापूस आंब्याची खरेदी करताना सजग आणि जागरूक राहणे गरजेचे आहे.
असा ओळखा आंबा : साधारणपणे देवगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,पालघर या ठिकाणचा हापूस आंबा गोलाकृती असतो. तर मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या शहरातील फळांच्या बाजारपेठेत हापूस आंब्याच्या नावाखाली विक्रीसाठी येणारा कर्नाटक आणि इतर परराज्यातील आंब्याचा आकार हा उभट असतो. तर अस्सल देवगड हापूस आंब्याची ओळख म्हणजे वेलची केळीसारखी अतिशय पातळ साल, स्वादाला मधुर आणि सुगंधित घमघमाट असा थाट या आंब्याचा असतो. परंतु मागील तीन वर्षांपासून विशेष करून कोव्हीड काळात हापूस आंबा खरेदी करताना ग्राहकांची फसवणूक संदर्भात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यावेळी आम्ही वेळोवेळी ग्राहकांशी संवाद साधून जनजागृती करण्यात आली होती.
आंब्याची एक अनोखी ओळख: हापुस, केसर, पायरी, लंगडा तोतापुरी या सर्व आंब्यांची आपली अनोखी ओळख आहे. ही ओळख त्याच्या आकारावरून त्याच्या सुगंधांवरून केली जाते. महाराष्ट्रात पिकणाऱ्या आंब्यांमध्ये एक वेगळी गंध आणि वेगळी चव असते. त्यामुळे जर आंबे घ्यायचे असतील तर ते राज्य सरकारच्या प्रमाणपत्राच्या आधारेच आंबे घ्यावेत. अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते असे आवाहन देखील शेतकरी करत आहेत.
हेही वाचा:Hapus Mango गावखडी येथून जिल्ह्यातील हापूस आंब्याची पहिली पेटी पुण्याला रवाना