ठाणे -कल्याणच्या रेल्वे स्थानकात काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. धावत्या एक्स्प्रेसमध्ये चढताना एका प्रवाशाचा तोल जाऊन रेल्वे फलाटाच्या गॅपमध्ये जात असताना रेल्वे स्थानकात कर्तव्य बजावणाऱ्या एका आरपीएफ जवानाने ( CRPF Jawan Save Man On Railway Station ) तत्परतेने धाव घेत, त्या प्रवाशाला फलाट व गॅपमध्ये जाण्यापूर्वीच बाहेर काढल्याने त्याचे प्राण वाचवले. हा धक्कादायक प्रकार रेल्वेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रोशन जाधव, असे त्या प्रवाशाला वाचविणाऱ्या आरपीएफ जवानाचे नाव आहे. पवन अशोक उपाध्याय (३३) असे जीव वाचलेल्या प्रवाश्याचे नाव आहे.
Thane CRPF Jawan Saved Man : धावत्या रेल्वेखाली जाणाऱ्या प्रवाशाचे आरपीएफ जवानाने वाचवले प्राण; घटना CCTV मध्ये कैद - ठाणे रेल्वे स्थानक सीसीटीव्ही व्हिडीओ
एका प्रवाशाचा तोल जाऊन रेल्वे फलाटाच्या गॅपमध्ये जात असताना रेल्वे स्थानकात कर्तव्य बजावणाऱ्या एका आरपीएफ जवानाने ( CRPF Jawan Save Man On Railway Station ) तत्परतेने धाव घेत, त्या प्रवाशाला फलाट व गॅपमध्ये जाण्यापूर्वीच बाहेर काढल्याने त्याचे प्राण वाचवले. हा धक्कादायक प्रकार रेल्वेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न -कल्याण रेल्वे स्थनाकाच्या फलाट क्रमांक ४वर आज दुपारच्या सुमारास गोदान एक्सप्रेस दाखल झाली होती. त्यावेळी उत्तरप्रदेशमधील सुलतानपूरला जाण्यासाठी पवन उपाध्यय फलाटावरून एक्सप्रेसमध्ये चढत असतानाच ट्रेन सुरु झाली. त्यामुळे त्यांनी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत असतानाच अचानक पवनचा तोल गेला आणि रेल्वे फलाटाच्या गॅपमधून रेल्वे रुळावर जात असताना कल्याण रेल्वे स्थानकात कर्तव्य बजावणाऱ्या रोशन जाधव या आरपीएफ जवानाने तत्परतेने प्रसंगावधान राखून त्यांच्याकडे धाव घेतली. पवनला फलाट व गॅपमध्ये जाण्यापूर्वीच बाहेर खेचल्याने त्याचे प्राण वाचवले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. प्रवाशी पवन याला दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर रोशन या आरपीएफ जवानाने तत्परतेने प्रसंगावधान राखून एका प्रवाशाचे प्राण वाचवल्याने रेल्वे प्रशासनामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.
हेही वाचा -Gunaratna Sadavarte Custody : अॅड. गुणरत्न सदावर्तेंची न्यायालयीन कोठडीत रवानगी