ठाणे - राज्यात लॉकडाऊन असताना ठाण्यातील मुंब्रा येथे रमजानच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. रस्त्यावर पाय ठेवायला देखील जागा नव्हती, इतकी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली. लॉकडाऊन काळात कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियम धाब्यावर बसवून नागरिकांनी अशा प्रकारची गर्दी केली असताना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा प्रकार समोर आला आहे. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे तज्ञांचे मत आहे.
रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा येथे प्रचंड गर्दी बघायला मिळाली, रस्त्यावरील गर्दीमुळे वाहनांना जायला देखील जागा नव्हती. रमजान नंतर येणारी ही ईद मुस्लीम बांधवांसाठी मोठा सण मानला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री मुंब्रा इथल्या बाजारात होते. मात्र सध्यो कोरोनामहामारी टाळण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अमृतनगर ते कौसापर्यंत रस्त्यावर नागरिक कोणतेही नियम न पाळता फिरत होते. उद्या देखील अशाच प्रकारे गर्दी होण्याची शक्यता आहे. गर्दी आवरण्यासाठी पोलीस किंवा पालिका कर्मचारी कुठेही दिसून आले नाहीत, या गर्दीकडे बघून आटोक्यात आलेली कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढण्याची भीती ठाणेकरांमध्ये दिसून येत आहे.
मुंब्र्यातील नागरिकांना कोरोनाचा विसर -