ठाणे - घोडबंदर परिसरातील ओवळा या गावातील विहिरीतून चार फुटी मगरीची वन विभागाने सुखरुप सुटका केली. गेल्या दोन दिवसांपासून पालिका अग्निशमन दल आणि वन अधिकारी मगरीचा शोध घेत होते.
विहिरीतील मगर वन विभागाच्या जाळ्यात हेही वाचा - धक्कादायक! दोन वर्षाच्या मुलीला पाण्यात बुडवून मातेने घेतले पेटवून
जाळीच्या सहाय्याने या मगरीला बाहेर काढण्यात आले आहे. या परिसराच्या जवळच असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तिला सोडले जाणार आहे. या उद्यानातून जलचर आणि भूचर प्राण्याचा वावर आता शहराकडे होताना दिसून येत आहे. पाणवठा आणि भक्ष्य मिळत नसल्याने प्राणी शहरांकडे वळत आहेत.
हेही वाचा - स्वामी नित्यानंदविरोधात इंटरपोलने जारी केली 'ब्लू नोटीस'