ठाणे- शहरातील सत्र न्यायालयात शुक्रवारी एका आरोपीने न्यायाधीशांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्यानंतर त्यांच्यावर चक्क चप्पल भिरकावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीचे नाव गणेश गायकवाड असे आहे. त्याच्यावर न्यायालयात खुनाचा खटला सुरु आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
.. या कारणाने आरोपीने न्यायाधीशांवर भिरकावली चप्पल
शहरातील सत्र न्यायालयात शुक्रवारी एका आरोपीने न्यायाधीशांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्यानंतर त्यांना चक्क चप्पल भिरकावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीचे नाव गणेश गायकवाड असे आहे.
गणेश गायकवाड या खुनाच्या आरोपीने रागाच्या भरात राजेश गुप्ता नामक न्यायधीशांवर चप्पल भिरकावली. खटल्याच्या सुनावणी दरम्यान आरोपीचा वकील गैरहजर राहिल्याने दुसरा वकील देण्याची शिफारस न्यायधिशानी केली होती. या गोष्टीचा राग आल्याने आरोपी गायकवाड याने न्यायधीशांना आधी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली व त्यानंतर आपली चप्पल न्यायधीशांना फेकून मारली. सुदैवाने ती चप्पल न्यायाधीशांना लागली नाही. मात्र, या घटनेमुळे न्यायालय परिसरात व शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी गणेश गायकवाड वर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा, ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.