महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लग्न समारंभात कोरोना नियमाचे उल्लंघन करणाऱ्या यजमानावर गुन्हे दाखल - wedding was attended by 700 people.

कल्याण पूर्वेतील 60 फुटी रोड गॅस कंपनी शेजारी येथे बुधवारी सायंकाळी पार पडलेल्या लग्नसमारंभात मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित असल्याची माहिती ड प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भंगाळे यांना मिळाली. ही माहिती मिळताच त्यांनी आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली असता, या लग्न समारंभाला सुमारे सातशे लोक उपस्थित असल्याचे दिसून आले. याबद्दल कोरोना नियमाचे उल्लंघन करणाऱ्या यजमानावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

violating Corona rules at a wedding
लग्न समारंभात कोरोना नियमाचे उल्लंघन

By

Published : Mar 11, 2021, 7:34 PM IST

ठाणे - कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात पालिका आयुक्तांनी अनेक निर्बंध लावले आहेत. असे असताना देखील लग्नसमारंभात या नियमाचे उल्लंघन करून गर्दी जमा करणाऱ्याच्या विरोधात महापालिका अधिकाऱ्याने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कल्याण पूर्वेत घडली आहे.

लग्नसमारंभाला 700 वऱ्हाडी उपस्थितीत ..

कल्याण पूर्वेतील 60 फुटी रोड गॅस कंपनी शेजारी येथे बुधवारी सायंकाळी पार पडलेल्या लग्नसमारंभात मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित असल्याची माहिती ड प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भंगाळे यांना मिळाली. ही माहिती मिळताच त्यांनी आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली असता, या लग्न समारंभाला सुमारे सातशे लोक उपस्थित असल्याचे दिसून आले. त्याप्रमाणे त्यांनी सामाजिक अंतराचे पालन न करणे, तोंडाला मास्क न लावणे, अशा प्रकारचे बेजबाबदारपणाचे वर्तन करून कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याचे दिसून आले.

कल्याण-डोंबिवली शहरात कोरोनाचा वाढता प्रभाव..

सध्या कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे कोरोनाला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासन वारंवार नागरिकांना सूचना करूनही काही नागरिक अद्यापही सूचनेचे पालन करताना दिसत नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीत नागरिकांनी वारंवार हात धुणे, सार्वजनिक ठिकाणी वावरताना न चुकता मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे, या त्रिसूत्रीचा अवलंब करावा असे अहवान महापालिकेतर्फे करण्यात येत आहे. तर लग्न समारंभात कोरोना नियमाचे उल्लंघन करणाऱ्या यजमानावर कोळसेवाडी पोलिस ठाण्यात भादवि कलम 188, 269, 270, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 51 तसेच covid-19 उपाय योजना नियम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हेही वाचा - 14 तारखेला होणारी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थीं संतप्त, विद्यार्थ्यांचा रास्ता रोको

ABOUT THE AUTHOR

...view details