ठाणे: शरीर सुखाची मागणी करणाऱ्या ग्राहकांच्या व्हॉट्सऍप नंबरवर तरुणीचे फोटो पाठवून सेक्स रॅकेट चालवणारी महिला दलाल बुलबुलला, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष ठाणे गुन्हे शाखेने सापळा रचून तिच्या एका साथीदारसह गजाआड केले आहे. शिवाय बुलबुलच्या तावडीतून दोन पडित तरुणींची सुटका करून कोनगाव पोलीस ठाण्यात पिटासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
तरुणींना दाखवली पैशाची आमिष : बुलबुल बानो हमीद खान (वय, २४ रा.मिरारोड ईस्ट) व रिक्षाचालक सुरेंद्र बाडो यादव (वय, ३१ रा.भाईंदर पश्चिम) अशी अटक करण्यात आलेल्या दलालांची नावे आहेत. विशेष म्हणजे महिला दलाल बुलबुल ही एका पिटा गुन्ह्यात फरार होती. मुबंई - नाशिक महामार्गवरील विविध लॉजिंग - बोर्डिंगमध्ये तरुणींना पैशाची आमिष दाखवून त्याच्यांकडून देहविक्रीय व्यवसाय करून, सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती, ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.
शरीर सुखाचा केला सौदा :पोलीस पथकाने मंगळवारी रात्रीच्या सुमारास मुंबई नाशिक महामार्गवरील सॉलिटीयर रेसिडेन्सी या लॉजिंग बोर्डिंगमध्ये सापळा रचला होता. त्यावेळी महिला दलाल बुलबुल बानो ही शरीरसुखाची मागणी करणाऱ्या ग्राहकांच्या व्हॉट्सऍप नंबरवर पडित तरुणींचे फोटो पाठवून शरीर सुखाचा सौदा करीत असताना आढळून आली. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने सॉलिटीयर लॉज परिसरात बुलबुल बानो आणि सुरेंद्रला ताब्यात घेतले. त्यावेळी ताब्यात घेतलेल्या दलालाची झाडाझडती घेतली असता, त्यांच्याकडील मोबाईल फोनसह ७२ हजार ६० रुपये हस्तगत केले. शिवाय दलालाच्या तावडीतून २१ व २४ वर्षीय दोन बळीत तरुणींची सुटका केली.
पीडित तरुणींची केली सुटका : दरम्यान, त्यांच्याविरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाचे प्रवीण दिवाळे यांच्या तक्रारीवरून कोनगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. तर पीडित तरुणींची सुटका करून त्यांची रवानगी महिला सुधार गृहात करण्यात आली आहे. बुलबुल बानो ही अनेक महिन्यांपासून काश्मीर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पिटा गुन्ह्यात फरार होती. बुधवारी महिला दलालसह तिच्या साथीदाराला न्यायालयात हजर केले असता, अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक अस्लेशा घाटगे करीत आहेत.
हेही वाचा -
- Pune Crime News: परराज्यातील महिलांचे सुरू होते पुण्यात सेक्स रॅकेट, 'असा' झाला पर्दाफाश
- Sex Racket jalna : घरगुती सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; कॉल गर्ल, सेक्स रॅकेट चालवणारे पती- पत्नी पोलिसांच्या ताब्यात
- Sex Racket Busted : मुलींचे कौमार्य तोडण्यासाठी लाखांचा सौदा; सेक्स रॅकेट चालवणाऱया दोघींना अटक