ठाणे - कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने काल (शुक्रवार) 'चस्का' हुक्का पार्लरवर छापा मारून 100 हुन अधिक तरुण तरुणींना हुक्का पिताना रंगेहात ताब्यात घेतले होते. आता त्यापोठापाठ भिवंडीच्या गुन्हे शाखेच्या पथकानेही भिवंडीतील खाडीपार परिसरात जॉय हुक्का पार्लरवर रात्रीच्या सुमारास छापा मारून 25 ते 30 जणांना ताब्यात घेतले आहे.
भिवंडीत हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा; 25 ते 30 जण ताब्यात
जिल्ह्यातील विविध शहरात आणखी काही हायप्रोफाइल भागात अशा प्रकारे सर्रासपणे हुक्का पार्लर सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याठिकाणी असणारा तरुण तरुणींचा ओढा पाहता अनेक प्रतिष्ठीत नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
भिवंडीत हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा
शहरातील हायप्रोफाइल भागात हुक्का पार्लर
जिल्ह्यातील विविध शहरात आणखी काही हायप्रोफाइल भागात अशा प्रकारे सर्रासपणे हुक्का पार्लर सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याठिकाणी असणारा तरुण तरुणींचा ओढा पाहता अनेक प्रतिष्ठीत नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. एखाद्या बड्या व्यक्तींच्या वरदहस्ताशिवाय हे हुक्का पार्लर सुरू राहणे अशक्य असून त्यावर वेळीच आवर घालणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.