ठाणे - उल्हासनगरमधील मराठमोळ्या प्रेम पाटील या तरुणाने तब्बल १२ तास टॅटू काढण्याचा विक्रम केला आहे. या विक्रमाची नोंद 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सलग १२ तासामध्ये २०० पेक्षा अधिक तरुण मुलामुलींच्या हातावर टॅटू काढण्यात आले आहे.
उल्हासनगरात सलग १२ तास टॅटू काढण्याचा विक्रम, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद - विक्रम
१२ तासात २०० पेक्षा अधिक टॅटू काढून उल्हासनगरातील तरूणाने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम रचला आहे.
अंगावर टॅटू काढण्याचे फॅशन सध्या तरुण पिढीमध्ये भलतेच वाढले आहे. यामुळे विविध शहरांमध्ये टॅटू काढण्याचे व्यवसाय फोफावले आहे. त्यातच उल्हासनगरमधील प्रेम पाटील या तरुणाला लहानपणी चित्रकलेची आवड असल्याने त्यांनीही हा व्यवसाय निवडला.
मागील ७ ते ८ वर्षापासून ते या व्यवसायात आहेत. व्यवसायात त्यांना वेगळे काही करून दाखवायचे होते. त्यामुळे त्यांनी तब्बल १२ तास २०० पेक्षा अधिक तरुण-तरुणींच्या हातावर टॅटू काढण्याचा विक्रम केला आहे. या विक्रमाची नोंद 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये करण्यात आली आहे. विशेष म्हणजे असे भारतामध्ये पहिल्यांदाच होत असल्याने खूप आनंद होत असल्याची प्रतिक्रिया प्रेम पाटील यांनी दिली आहे.