महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यामध्ये मुसळधार : गरज असेल तरच बाहेर पडा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

आवश्यकता असेल तरच घराबाहेर निघा, पोलीस नियंत्रण कक्षाच्या संपर्कात रहा, असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे.

By

Published : Aug 3, 2019, 3:43 PM IST

Updated : Aug 3, 2019, 7:04 PM IST

पूर परिस्थितीचा आढावा घेतांना पोलीस आयुक्त

ठाणे - शहरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे प्रशासनाच्यावतीने नागरिकांना सर्तकतेचा ईशारा देण्यात आला आहे. आवश्यकता असेल तरच घराबाहेर निघा, पोलीस नियंत्रण कक्षाच्या संपर्कात रहा, असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे.

गरज असेल तरच बाहेर पडा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

या परिस्थितीत वाहतूक कोंडी तसेच आपत्ती जनक परिस्थितीला तोंड देण्यासाठी ठाणे पोलीस सज्ज असून स्वत: ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे रस्तावर उतरुन परिस्थितीची पाहणी करत असून ठाणे पोलीसांचे मनोबल वाढवत आहेत. पावसामुळे शॉक लागून उल्हासनगर आणि ठाणे येथे दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे ठाण्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. तसेच यामुळे सर्वत्र वाहतूक कोंडी पहायला मिळत आहे.

महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांच्या आम्ही संपर्कात आहोत. परिस्थीतीचा अंदाज घेत जिल्हाधिकाऱयांनी सकाळीच शाळांना सुट्टी जाहीर केल्यामुळे परिस्थीती नियंत्रनात आहे. प्रत्येक नागरिकानी आपापली काळजी घ्यावी व गरज असल्यासच बाहेर पडावे, असे आवाहन पोलिस आयुक्त विवेक फनसळकर यांनी इटीव्ही भारतच्या माध्यमातून केले आहे.

Last Updated : Aug 3, 2019, 7:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details