महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोविड टेस्टिंग घोटाळा : दरेकर यांनी महापालिका आयुक्तांना दोषींवर कारवाई करण्याची केली मागणी - Commissioner Abhijit Bangar news

नवी मुंबईतील कोविड टेस्टिंग सेंटरमधील घोटाळ्या प्रकरणी मी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांना पत्र देणार आहे. तसेच, यामागे खरा सूत्रधार कोण आहे, हे लवकरच समोर येईल, असेही दरेकर यांनी सांगितले.

Pravin Darekar news
दरेकर यांनी महापालिका आयुक्तांना दोषींवर कारवाई करण्याची केली मागणी

By

Published : Nov 26, 2020, 10:11 PM IST

नवी मुंबई - देशातील कोरोना उपचार केंद्रांची विदारक परिस्थिती सर्वत्र परिचयाची आहे. त्यामुळे, कोरोना केंद्रांच्या सोयी सुविधांवर नागरिक ताशेरे ओढत आहेत. त्यात नवी मुंबईतील कोविड टेस्टिंग सेंटरमधील घोटाळ्याची आणखी एक भर पडली आहे. यात चक्क 10 वर्षापूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अहवाल देऊन शासनाकडून पैसे लाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

माहिती देताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

आयुक्त बांगर यांनी दोषींवर चौकशी करून कडक कारवाई करण्यात येईल, असे दरेकर यांना सांगितले. आतपर्यंत आमच्या माध्यमातून राज्यातील कोविड सेंटर्स प्रकरणी 150 ते 200 पत्र शासनाला देण्यात आली आहेत. मात्र, शासनाच्या माध्यमातून त्यावर काहीच कारवाई करण्यात आलेली नाही. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे हतबल झाले असून, त्यांना परिस्थिती सांभाळणे अवघड जात आहे. मृत लोकांचे अहवाल दाखवतात. काही नागरिक गावाला आहेत. त्यांची माहिती घेऊन परस्पर खोटे अहवाल तयार करून पैसे लाटणे सुरू आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची आकडेवारी फुगवण्याचा हा प्रकार निषेधार्ह आणि धक्कादायक आहे. याप्रकरणी केवळ चौकशी न करता तातडीने संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.

तसेच, नवी मुंबईतील कोविड टेस्टिंग सेंटरमधील घोटाळ्या प्रकरणी मी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांना पत्र देणार आहे. तसेच, यामागे खरा सूत्रधार कोण आहे, हे लवकरच समोर येईल, असेही दरेकर यांनी सांगितले.

हेही वाचा -वाढीव वीज बिलाविरोधात मनसेचे राज्यव्यापी आंदोलन; अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांची धरपकड

ABOUT THE AUTHOR

...view details