मीरा भाईंदर(ठाणे) - शहरातील जनतेनी दिलेल्या चांगल्या प्रतिसादामुळे कोरोना बधितांच्या रुग्ण संख्येत घट झाली आहे. त्यामुळे गोल्डन नेस्ट परिसरातील अलगीकरण कक्ष, मिरारोड मधील पेनकर पाडा कोविड केयर सेंटर बंद करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे.
मीरा भाईंदरमधील दोन कोविड केंद्र बंद; रुग्णांच्या संख्येत घट झाल्यामुळे मनपाचा निर्णय
रुग्णांच्या संख्येत वाढ सुरू असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात आली. मनपा प्रशासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र, घरोघरी जाऊन तपासणी करणे, रॅपिड टेस्टिंग, लक्षणीय तपासणी केली आणि त्याला चांगला प्रतिसाद नागरीकांकडून मिळाला. त्यामुळे कोरोना बधितांच्या रुग्णांमध्ये घट झाल्याने दोन कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मीरा भाईंदर शहरात कोरोना बधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत होती. त्यामुळे राज्य सरकार आणि मनपा प्रशासनाने तात्काळ मीरा भाईंदर शहरात कोविड केंद्राची उभारणी करण्यात आली. यामध्ये संशयित रुग्णांसाठी कोविड केयर सेंटर, अलगीकरण कक्ष, विलगिकरण कक्ष तयार करण्यात आले.