ठाणे -उल्हासनगरमधील नेताजी चौकात शिंदे गटाचे माजी नगरसेवक अरुण आशान Former corporator of Shinde group Arun Ashan यांच्या दहीहंडीत ८० फुटावर दोरीला Dahihandi Thane लटकून येत भोला वाघमारे या तरुणाने दहीहंडी फोडली. यानंतर मोठा गोंधळ उडाला आणि पोलिसांनी भोलाला ताब्यात घेत अटक केली. त्यानंतर भोलाला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची पर्सनल बॉण्डवर सुटका केली. मात्र त्याने एकट्याने दहीहंडीने ५५ हजार ५५५ रुपये बक्षिस भोलाला मिळावे, असा न्यायालयात युक्तिवाद भोलाच्या वकिलाने केला आहे. त्यामुळे दहीहंडी फोडल्याचा वाद न्यायालयात गेल्याने आता आयोजक खरंच भोलाला बक्षिसाची रक्कम देणार का ? असा चर्चेचा विषय ठरला आहे.
प्रतिक्रिया देताना भोलाचे वकील
'पोलीस पुरावा न्यायालयात सादर करू शकले नाही' :भोलाच्या वकिलाचे सांगितले कि, न्यायालयाच्या आपण हे निदर्शनास आणून दिल्याचे वकील सुमित गेमनानी यांनी सांगितले. ही दहीहंडी फोडण्यासाठी आवाहन आयोजकांनी केले होते, त्यात मनोरे रचून हंडी फोडावी असा कोणताही उल्लेख नव्हता. त्यामुळे भोलाने हंडी फोडली, आता त्याला आयोजकांना बक्षीस देण्यासाठी नोटीस पाठवायची असेल तर तो वकीला मार्फत पाठवू शकतो. शिवाय भोलाने दारू पिऊन हंडी फोडली म्हणून ज्या कलमाखाली त्याला अटक झाली हे पोलिसांना न्यायालयात सिद्ध करता आले नाही, असे देखील वकील गेमनानी यांनी सांगितले.
असा घडला दहीहंडीच्या दिवशी थरार :दहीहंडीच्या दिवशी सर्वत्र उत्सव साजरा होत असतानाच शिंदे गटातील उल्हासनगर महापालिकेचे माजी नगरसवेक अरुण आशान यांच्या जय भवानी मित्र मंडळांच्या वतीने कॅम्प नंबर पाचमधील नेताजी चौकात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. ही दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला ५५ हजार ५०० रुपयांचे बक्षीस जाहीर केले. त्यातच दहीहंडीचा उत्सव शिगेला पोहचला असतानाच रात्री साडे दहाच्या सुमारास दारूच्या नशेत असलेला भोला हा एका बाजुच्या लोखंडी खांबावर गुपचूपपणे चढला. त्यानंतर ३० फूट लांब असलेल्या दहीहंडीजवळ पोहचण्यासाठी जीव धोक्यात घालून दोरीला उलटा सरपटत जाऊन हंडीच्या ठिकाणी पोहचला. तोपर्यत बध्याच्या गर्दीमधून एकाने मोबाईलमध्ये त्याचे चित्रीकरण केले. तर दुसरीकडे त्याचे बरेवाईट होईल यामुळे आयोजकांनी तातडीने लोखंडी खांबाला बांधलेली दोन्ही बाजूची दोरी हळूहळू सोडून त्याला खाली आणण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच, त्याने उंचावरच डोक्याने दहीहंडी फोडल्याचे पाहून गोविंदा पथकासह नागरिकांनी त्याच्या हिंमतीला दाद दिली. त्यामुळे हंडीवरून सुरू झालेल्या हा सगळया गोंधळा नंतर हंडी फोडण्याचे बक्षीस पोलिसांनी अटक केलेल्या भोलाला मिळेल का हे पाहावे लागेल.
हेही वाचा -Amid Liger Boycott Trend 25 ऑगस्टला लाइगर चित्रपट पडद्यावर धुमाकूळ घालणार, विजय देवरकोंडाने दिली हमी