महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक.. पैशासाठी माता-पित्यांनी पोटच्या तीन मुलांचा केला सौदा, माता गजाआड तर पिता फरार - माता-पित्याने पोटच्या तीन मुलांना विकले

पोटच्या मुलांना पैशाच्या हव्यासापोटी विकणाऱ्या नराधम माता पित्याचा काळा चेहरा नवी मुंबई शहरात उघडकीस आला आहे. या माता-पित्याने एक दोन नव्हे तर चक्क तीन मुलांचा सौदा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मातेला पोलिसांनी अटक केले असून नराधम पिता फरार झाला आहे. त्याचा नवी मुंबई पोलीस शोध घेत आहेत.

Child trafficking case
Child trafficking case

By

Published : Jan 22, 2022, 7:19 PM IST

Updated : Jan 22, 2022, 7:30 PM IST

नवी मुंबई -पोटच्या मुलांना पैशाच्या हव्यासापोटी विकणाऱ्या नराधम माता पित्याचा काळा चेहरा नवी मुंबई शहरात उघडकीस आला आहे. या माता-पित्याने एक दोन नव्हे तर चक्क तीन मुलांचा सौदा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मातेला पोलिसांनी अटक केले असून नराधम पिता फरार झाला आहे. त्याचा नवी मुंबई पोलीस शोध घेत आहेत.

नेरुळ रेल्वे स्थानक आवारात राहत होते दाम्पत्य -
नेरूळ रेल्वे स्थानकाच्या आवारात आयुब शेख (35) व शारजा शेख (30) हे दाम्पत्य राहत होते. शारजा ही गरोदर होती व प्रसूतीनंतर रेल्वे स्थानक परिसरात तिच्या बाळासह आढळून येत होती. मात्र काही दिवसांनी तिच्या जवळ बाळ नव्हते व ती एकटीच दिसत होती. नवजात बाळ शारजाजवळ नसल्याने शारजाने बाळाची बेकायदेशीर विक्री केली असल्याचा संशय सामाजिक कार्यकर्त्यांना आला. त्यांनी याची माहिती ठाणे जिल्हा महिला बालविकास विभागाला माहिती दिली. त्यानुसार बालविकास विभागाने गुरुवारी शारदाला ताब्यात घेतले. मात्र तिचा पती आयुब फरार झाला.

माता-पित्यांनी पोटच्या तीन मुलांचा केला सौदा
चौकशीत तीन मुलांचा सौदा केल्याची मिळाली धक्कादायक माहिती -
महिला बालविकास विभागाने ताब्यात घेतल्यावर शारजाला तिच्या नवजात बाळासंबंधी विचारणा केली. त्यावेळी तिने सांगितले की, तिने व तिच्या पतीने संगनमताने त्यांच्या पोटच्या तीन मुलांची बेकायदेशीर विक्री केली आहे. 2019 मध्ये जुलै महिन्यात बेलापुर सीबीडी येथील एका महिलेला 90 हजाराला त्यांनी नवजात बाळ विकले होते तर गेल्या महिन्यात दोन लाख रुपयाला सोलापूर येथील एका महिलेला या दाम्पत्याने बाळ विकले होते. तसेच या अगोदरही या दाम्पत्याने त्यांचे नवजात बाळ दीड लाख रुपयांना बेकायदेशीरपणे विकले होते. तर अशा एक दोन नव्हे तर चक्क तीन पोटच्या मुलांना विकल्याचे शारजाने कबूल केले. यापैकी बेलापुर सीबीडी व सोलापूर येथे ज्या महिलांना बाळ विकले होते त्या महिलांना पोलिसांनी बोलावून घेतले व त्यांच्याकडून ही दोन्ही मुले ताब्यात घेतली आहेत. तसेच तिसऱ्या विक्री झालेल्या बाळाचा शोध नेरूळ पोलीस घेत आहेत. या प्रकरणी शारजा व आयुब शेख यांच्याविरुद्ध तसेच अवैधरित्या बाळ खरेदी करणाऱ्या महिलांवर देखील नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शारजा हिला अटक करण्यात आली असून तिचा पती अयुब हा फरार झाला आहे. त्याचा शोध नेरूळ पोलीस घेत आहेत.
Last Updated : Jan 22, 2022, 7:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details