कल्याण (ठाणे) -चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील भागात एक दामप्त्य पडल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकावर घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. ही घटना रविवारी सकाळी ९.१२ वाजता कल्याण रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ४/५ वर घडली.
कोणतीही जीवित हानी नाही -
कल्याणचे मुख्य तिकीट निरीक्षक जसपाल सिंग राठोड म्हणाले, "एक विवाहित जोडपे धावत्या उद्यान एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना ते प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील भागात पडले. या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही."