ठाणे- अंबरनाथ रेल्वे स्थानकानजीक प्रियकर आणि प्रेयसीने रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्रीती अनंता धादवड (वय २२) आणि योगेश गोपीचंद बेंडारे (वय ३२) असे आत्महत्या करणाऱ्यांची नावे असून दोघेही अंबरनाथ तालुक्यातील खुंटवली गावातील राहणारे होते.
रेल्वेसमोर उडी घेत प्रेमी युगुलाची आत्महत्या; अंबरनाथ रेल्वे स्थानकानजीकची घटना - प्रेमी युगुलाची आत्महत्या अंबरनाथ ठाणे
आत्महत्या करणारे प्रीती आणि योगेश हे दोघे नात्याने मामा-भाची असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.
आत्महत्येपूर्वी स्वतःच मोबाईल व्हॉटअपच्या स्टेटसवर वाहिली श्रद्धांजली
अंबरनाथ रेल्वे स्थानकानजीक धावत्या ट्रेन खाली शुक्रवारी रात्रीच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. धक्कादायक बाब म्हणजे या दोघांनी आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःच्या मोबाईल व्हॉटअपच्या स्टेटसवर श्रद्धांजली वाहिली असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. आत्महत्येचे कारण मात्र समोर आलेले नाही. या दोघांच्या आत्महत्येमुळे ते राहत असलेल्या भागात शोककळा पसरली आहे. आत्महत्या करणारे प्रीती आणि योगेश हे दोघे नात्याने मामा-भाची असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.