ठाणे: मुल जर अश्या कुटुंबात वाढत असेल जिथे आईवर किंवा त्याच्यावर हिंसा होत असेल तर त्याची हिसंक मानसिकता बनू शकते. काही मुलांना जे हवे असेल ते त्याचे आईवडील त्याला देत असतात. असे मूल 'नाही' 'नको' असे शब्दाच सहन करू शकत नाही. मग ते मूल आक्रमक होते. काही पालक मुलांचे अतिलाड करतात. मुले कसेही वागले तरी त्यांना काहीच म्हणत नाहीत. त्याच्या चुकीच्या वागण्याला बरोबर करीत नाहीत किंवा ते चुकत आहे असेही त्याला सांगत नाहीत. काही वातावरणात, लहानसहान गोष्टीत मारामारी आणि हिंसा अश्याच गोष्टी मुले बघत आलेली असतात. म्हणून एखाद्या विषयावर मत मांडले जावू शकते किंवा मतभेद असू शकतात. ते विषय सामंजस्याने सोडविता येवू शकतात ह्याची जाणीवच येत नाही. मग ते प्रत्येक गोष्टीत हिंसा आणि वादविवाद करतात.
स्वभावाची कारणे: काही माणसे खूप पझेसिव्ह असतात. ते त्याच्या प्रेमिकेचा अतिप्रेमाने जीव घुसमटून जातो. त्यातून वादविवाद झाला तर मग ते हिंसक होतात.
काही खूप संशयी असतात, विनाकारण संशय घेतात. संशयपोटी ते हिसंक बसतात आणि आपल्या प्रेमिकेवर वार करतात. काही 'मेगॅलोमॅनिक' म्हणजे स्व केंद्रित असतात. स्वतःला अतिशय उच्च प्रतीचे समजतात. त्यामुळे दुसर्याचे मत नगण्य मानतात. काही भावनावश असतात, त्यांना गोष्टी त्वरित पाहिजे असतात. अशी भावनावश माणसे त्वरित हिंसक होवू शकतात.
अशी हल्ले कशी रोखायची : मुलींनी अगदी लहान सहान गोष्टीतही स्वतःवरील हीन वागणूक सहन करू नये. अश्याने मोठे जीवघेणे हल्ले करण्याचे धाडस कोणी करणार नाही. आपल्या बोलण्यात स्पष्टता पाहिजे. स्पष्ट नकार, स्पष्टपणे आपले मत मांडले पाहिजे. योग्य प्रत्युत्तर नेहमीच दिले पाहिजे. असा हल्ला होतच असेल किंवा तशी परिस्थिती वाटत असेल तर ओरडून दुसर्यांची मदत मागावी. वेळप्रसंगी अश्या परिस्थितीतून पळ काढावा. तसेच त्याबद्दलची तक्रार नोंदवावी.