महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शासकीय धान्याचा काळाबाजार; भ्रष्टाचारी सत्ताधारी नेते, शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करा, मनसे नेत्याची मागणी - लॉकडाऊनमध्ये भ्रष्टाचार

कोरोनाच्या संकटात सरकारी मदत म्हणून आलेलं धान्य गरिबांना न देता सत्ताधारी शिवसेनेतील एका मोठ्या राजकीय नेत्याने आपल्या नावाचे स्टिकर लावून आपल्याच मतदारसंघात वाटल्याचा थेट आरोप मनसेचे ठाणे पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी केला आहे.

शासकीय धान्याचा काळाबाजार आणि भ्रष्टाचार सत्ताधारी नेते आणि शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करा मनसे नेते आक्रमक
शासकीय धान्याचा काळाबाजार आणि भ्रष्टाचार सत्ताधारी नेते आणि शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करा मनसे नेते आक्रमक

By

Published : May 4, 2020, 10:30 AM IST

Updated : May 4, 2020, 11:12 AM IST

ठाणे -कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. असे असतानाच हातावर पोट असलेल्या गोरगरिबांसाठी पुरवण्यात आलेल्या धान्यामध्ये ठाण्यातील बडे राजकीय नेते आणि शासकीय अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा खळबळजनक आरोप मनसेचे ठाणे पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी केला आहे.

शासकीय धान्याचा काळाबाजार आणि भ्रष्टाचार सत्ताधारी नेते आणि शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करा मनसे नेते आक्रमक

कोरोनाच्या संकटात सरकारी मदत म्हणून आलेलं धान्य गरिबांना न देता सत्ताधारी शिवसेनेतील एका मोठ्या राजकीय नेत्याने आपल्या नावाचे स्टिकर लावून आपल्याच मतदारसंघात वाटल्याचा थेट आरोप जाधव यांनी केला आहे. यासंदर्भात सदर राजकीय नेता आणि शासकीय अधिकारी यांनी संगनमत करत हे धान्य पुन्हा पॅक करून त्यावर त्या बड्या नेत्याच्या नावाचे स्टिकर लावून वाटले. गरिबांसाठी आलेले हे धान्य इमारतींमध्ये राहणाऱ्या धांडग्याना देखील वाटण्यात आल्याने जाधव यांनी आश्चर्य व्यक्त केले. दरमहा पाच हजार उत्पन्न असलेल्यांना रेशनचे धान्य नाकारणारे तसेच लाखोंचे उत्पन्न घेणाऱ्यांना मोफत धान्य कसे मिळाले, असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला. अशा प्रकारचा घोटाळा होण्याची शक्यता असल्याचे पत्र कल्याणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी 30 मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते. परंतु, त्यावर कोणतीच कारवाई न झाल्याने राजू पाटील यांनी पुन्हा एकदा या सगळ्या प्रकारची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Last Updated : May 4, 2020, 11:12 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details