महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कल्याण डोंबिवलीत कोरोनामधून उभी राहिली भ्रष्टाचाराची साखळी! - कल्याण डोंबिवली महापालिका भ्रष्टाचार

जागरूक नागरिक संघटनेने दिलेल्या तक्रारीत महापालिकेच्या रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयात कोरोना स्वॅब टेस्टिंगसाठी रुग्णांकडून 2 हजार 800 रुपये घेतले जातात. मात्र, त्या पैशाची पावती दिली जात नाही. विशेष म्हणजे रुग्ण जर हॉस्पिटलला आला तर 2 हजार 200 घ्यावेत असा शासकीय निर्णय आहे. मात्र, मागणी करूनही कोरोना स्वॅब टेस्टिंगच्या रक्कमेची पावती न देणे म्हणजे यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता घाणेकर यांनी वर्तवली आहे.

thane
कल्याण डोंबिवलीत कोरोनामधून उभी राहिली भष्ट्राचाराची साखळी!

By

Published : Jul 7, 2020, 7:01 PM IST

ठाणे - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाने थैमान घातले आहे. याच कोरोनामधून भ्रष्टाचाराची साखळी उभी राहीली असून, अक्षरशः रुग्णांची आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप जागरूक नागरिक संघटनाने केला आहे. तर रुग्णांची होणारी आर्थिक लूट करून उभी राहिलेली भ्रष्टाचाराची साखळी तोडण्यासाठी पालिका प्रशासनाकडे त्यांनी तक्रार दिली आहे. जर तक्रार करूनही कोरोनामधून उभी राहिलेली भ्रष्टाचाराची साखळी तुटली नाही तर यासाठी न्यायालयात धाव घेणार असल्याचे जागरूक नागरिक संघटनेचे पदाधिकारी श्रीनिवास घाणेकर यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

हेही वाचा -मराठा आरक्षण : आजची सुनावणी संपली; पुढील महिन्यात होणार दैनंदिन सुनावणी

जागरूक नागरिक संघटनेने दिलेल्या तक्रारीत महापालिकेच्या रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयात कोरोना स्वॅब टेस्टिंगसाठी रुग्णांकडून 2 हजार 800 रुपये घेतले जातात. मात्र, त्या पैशाची पावती दिली जात नाही. विशेष म्हणजे रुग्ण जर हॉस्पिटलला आला तर 2 हजार 200 घ्यावेत असा शासकीय निर्णय आहे. मात्र, मागणी करूनही कोरोना स्वॅब टेस्टिंगच्या रक्कमेची पावती न देणे म्हणजे यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता घाणेकर यांनी वर्तवली आहे.

मेट्रोपॉलीस लॅबकडून मोफत कोरोना चाचणी देऊ केल्या आहेत. मात्र, त्याचीही माहिती रुग्णाला दिलीच जात नाही. उलट कल्याणातील रुख्मिणीबाई रुग्नालयातील खासगी लॅब चालक कोरोना चाचणी रक्कम वसूल करण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे मोफत कोरोना चाचणी केवळ डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपलब्ध आहेत, कल्याणला नाहीत. असे तक्रारीत नमूद केले आहे.

श्रीनिवास घाणेकर - पदाधिकारी, जागरूक नागरिक संघटना

पुणे महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिका यांनी जशा रॅपिड टेस्ट घेणे सुरू केल्या आहेत. तशा कल्याण डोंबिवली महापालिकेने ही सुरू कराव्यात. या टेस्ट फक्त 400 रुपयात होतात आणि त्याचा रिपोर्टसुद्धा त्याच दिवशी मिळतो. त्यामुळे महापालिकेने तातडीने ही सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावी. विशेष म्हणजे कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढतच असल्याने रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयात कोरोना संशयित आणि बाधित रुग्ण एकत्र गर्दी करून स्वॅब देण्यासाठी उभे असतात. तर सध्या पावसात खूप गर्दी या ठिकाणी होते. त्यामध्ये गरोदर स्त्रिया, लहान मुले, वृद्ध व्यक्ती सगळेच एकत्र गर्दीत करून उभे राहत असल्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येतात. याठिकाणी कोणतेही सोशल डिस्टन्स ठेवले जात नसल्याचे तक्ररीत म्हटले आहे.

खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांची सर्रास लूट सुरू आहे. रुग्ण दुसऱ्या कोणत्या आजारासाठी जरी हॉस्पिटलला आला तरी कोरोना टेस्टसाठी त्याची पिळवणूक केली जाते. त्यातूनच त्याच्याकडून कोरोनाची भीती दाखवून अव्वच्या सव्वा रक्कम घेतली जाते, असे तक्ररीत म्हटले आहे.

हेही वाचा -'कोव्हॅक्सिन'च्या क्लिनिकल चाचणीसाठी हैदराबादमध्ये नोंदणी सुरू..

दरम्यान, कल्याण भिवंडी रोडवरील टाटा आमंत्रण येथे असलेल्या कोविड रुग्णालयात तर गैरसोयींबाबत अनेक तक्रारी आमच्याकडे रोज प्राप्त होत आहेत. अत्यंत गलिच्छ अशा वातावरणात रुग्णांना ठेवले जात असल्याच्या तक्रारी जास्त आल्याचे घाणेकर यांनी सांगितले. तर, पालिकेच्या डॅश बोर्डवर कोणत्या हॉस्पिटलला किती बेड्स उपलब्ध आहेत आणि त्याचे किती चार्जेस होतात. ही माहिती नागरिकांना उपलब्ध होणे गरजेचे आहे. जेणेकरून नागरिकांची होणारी परवड थांबू शकेल. अशा स्वरूपाचे तक्रार पत्र कल्याण डोंबिवली महानगरपालिका, आयुक्त डॉ, सूर्यवंशी यांच्याकडे कारवाईसाठी दिल्याचे जागरूक नागरिक संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details