नवी मुंबई -आज नवी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढली असून ती 13 वरून 22 इतकी झाली आहे. रुग्णांच्या संख्येत झालेली झपाट्याने वाढ यामुळे नवी मुंबई परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
नवी मुंबईत काल दिवसभरात 9 कोरोनाचे रुग्ण आढळले. यानंतर दिवसभरात एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 22 वर पोहचला. यापैकी वाशीत 5, नेरुळात 2, कोपरखैरणेत 2 रुग्ण आढळले आहेत.
नवी मुंबईत कोरोनाचे संकट वाढले, कोरोना बाधितांची संख्या 13 वरून 22 वर.. - world health emergency
नवी मुंबईत काल दिवसभरात 9 कोरोनाचे रुग्ण आढळले. यानंतर दिवसभरात एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 22 वर पोहचला. यापैकी वाशीत 5, नेरुळात 2, कोपरखैरणेत 2 रुग्ण आढळले आहेत.
नवी मुंबईत कोरोनाचे संकट वाढले
नवी मुंबईतील नूर मशिदीत झालेल्या धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या फिलीपिन्स नागरिकांच्या संपर्कात आल्याने तीन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली होती. या तिघांत वाशीतील मौलानाचाही समावेश होता. या मौलानाच्या कुटुंबातील तीन सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली होती.याच फिलीपिन्स नागरिकांच्या सहवासात आल्याने नवी मुंबईत आणखी 9 रुग्ण आढळले आहेत. यामुळे नवी मुंबईत कोरोनाचे संकट वाढले आहे.