महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इंग्लंडवरून कल्याणामध्ये आलेल्या एकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह - ठाणे कोरोना बातमी

इंग्लंडवरून आलेल्या एका व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्याची प्रकृती स्थिर असून त्याला कोणतीही लक्षणे आढळून आली नसल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

corona test report of one who came to kalyan from england is positive
इंग्लंडवरून कल्याणामध्ये आलेल्या एकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह

By

Published : Dec 26, 2020, 3:12 PM IST

ठाणे -इंग्लंडवरून कल्याण-डोंबिवलीत आलेल्या ५५ नागरिकांपैकी पैकी २० जणांचा शोध घेण्यास पालिकेला यश आले असून या पैकी एक जण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

२० नागरिकांचे आरटीपीसीआर -

इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत बदल झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून महानगरपालिका क्षेत्रात आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात आतापर्यंत २० नागरिकांचे आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या आहे. त्यापैकी एका नागरिकाचे स्वॅब मुंबई येथे पाठविण्यात आले. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याला इतर कुठलीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. तसेच या नागरिकाला विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

महापालिकेचे नागरिकांना आवाहन -

सलग जोडून आलेल्या सुट्ट्या आणि येणाऱ्या नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दी करणे टाळावे, घराबाहेर फिरताना न चूकता मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे आणि काही लक्षणे आढळल्यास महापालिकेच्या नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले आहे.

हेही वाचा - विरोधी पक्षांची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी...सामनातून काँग्रेसवर 'बाण'

ABOUT THE AUTHOR

...view details