ठाणे - मागील आठवड्यात दुबईवरून ठाण्यातील उल्हासनगरात आलेल्या कोरोनाचा संशयित रुग्णाला पुढील तपासणीसाठी मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
दुबईतून ठाण्यात आलेला कोरोना संशयित मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल - corona update mumbai
मागील आठवड्यात दुबईवरून ठाण्यातील उल्हासनगरात आलेल्या कोरोनाचा संशयित रुग्णाला पुढील तपासणीसाठी मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.सध्या या तरुणाची प्रकृती स्थिर असून योग्य ती दक्षता घेण्यात येत आहे.
हेही वाचा - वादळी वाऱ्यासह पाऊस आला अन् गहू, ज्वारीसाठी केलेला खर्च क्षणार्धात मातीत गेला'
9 मार्चला दुबईतुन उल्हासनगरात परतलेल्या 27 वर्षीय विवाहित तरुणाला ताप आल्याने उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुधाकर शिंदे यांनी केली. याबद्दल पालिका आयुक्त सुधाकर देशमुख आणि डॉ. राजा रिजवानी यांनाही माहीती देण्यात आली. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून त्याला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सध्या या तरुणाची प्रकृती स्थिर असून योग्य ती दक्षता घेण्यात येत असल्याची माहिती डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली. या तरुणाची रुग्णालयात तपासणी होणार असून काही नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. त्यामुळे घाबरायचे अजिबात कारण नाही असे पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले.