महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टिटवाळ्यात स्वॅब संकलन केंद्र सुरू, माफक दरात होणार तपासणी - covid testing center thane news

लोकांच्या सोईसाठी राजा पातकर यांनी टिटवाळा येथील रियाराज हॉटेलमध्ये गुरुवारी स्वॅब संकलन केंद्र सुरू केले. कल्याण डोंबिवली मनपाकडून रितसर अधिकृत परवानगी घेऊन हे केंद्र सुरू करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. या केंद्रात प्रत्येकी तपासणी ही २ हजार ५०० रुपये माफक दरात करण्यात येणार आहे.

कोरोना नमुना संकलन केंद्र
कोरोना नमुना संकलन केंद्र

By

Published : Jul 30, 2020, 5:43 PM IST

ठाणे -गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कोरोनामुळे संपूर्ण जग हादरून गेले आहे. जिल्ह्यातही कोरोनाने हातपाय पसरवले असून सध्या ग्रामीण भागातही शेकडो नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. हीच बाब लक्षात घेऊन लोकांच्या सोईसाठी समाजसेवक राजा पातकर यांनी टिटवाळा येथील रियाराज हॉटेलमध्ये गुरुवारी स्वॅब संकलन केंद्र सुरू केले.

टिटवाळा शहरी भागासह लगतच्या ग्रामीण भागात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे या लोकांना कोरोना चाचणीसाठी कल्याण, उल्हासनगर व डोंबिवली आदी शहरी भागाकडे धाव घ्यावी लागत असे. परिणामी मोठ्या प्रमाणात या रुग्णांची वाताहत होत होती. त्याचबरोबर आर्थिक संकटालाही सामोरे जावे लागत होते. याचाच विचार करत येथील सामाजिक कार्यकर्ते राजा पातकर यांनी आपल्या टिटवाळा येथील गोवेली रोडवर असणाऱ्या रिया राज हॉटेलमध्ये गुरुवारी स्वॅब संकलन केंद्राचे उद्घाटन स्थानिक नगरसेवक संतोष तरे यांच्या हस्ते केले.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून रितसर अधिकृत परवानगी घेऊन हे केंद्र सुरू करण्यात आले असल्याची माहिती पातकर यांनी दिली. या केंद्रात प्रत्येकी तपासणी ही २ हजार ५०० रुपये माफक दरात करण्यात येणार आहे. यामुळे शहरी भागात जादा पैसे घेऊन तपासणी करून ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांची होणारी लूट व पिळवणूक थांबणार आहे. अशाप्रकारे लोकांची होणारी लुट व फसवणूक थांबावी म्हणून मी ही सेवा सुरू केली असल्याचे पातकर यांनी यावेळी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details