महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक ! विलगीकरण केंद्राच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून कोरोनाबाधित रुग्णाची आत्महत्या - टाटा आमंत्रा इमारत बातमी

कल्याण भिवंडी रोडवरील रांजनोली नाक्यावर असलेले 'टाटा आमंत्रा' या इमारतीतील विलगीकरण केंद्राच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून एका कोरोनाबधित रुग्णाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या करणारा हा रुग्ण 43 वर्षाचा असून डोंबिवलीचा रहिवासी होता.

धक्कादायक
धक्कादायक

By

Published : Jul 19, 2020, 10:11 PM IST

ठाणे : कल्याण भिवंडी रोडवरील रांजनोली नाक्यावर असलेल्या 'टाटा आमंत्रा' या टोलेजंग इमारतीतील विलगीकरण केंद्राच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून एका कोरोनाबधित रुग्णाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या करणारा हा रुग्ण 43 वर्षाचा असून डोंबिवलीचा रहिवासी होता.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत दिवसागणिक रुग्णाची संख्या पाचशेच्या घरात जात आहे. त्यातच डोंबिवली शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे. त्यामध्ये हा 43 वर्ष रुग्णही कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याला उपचारासाठी कल्याण भिवंडी रोडवरील टोलेजंग इमारती बसलेल्या विलगीकरण केंद्रात 17 जुलैपासून उपचार सुरू होते. मात्र, आज दुपारी साडेचारच्या सुमारास या रुग्णाने पाचव्या मजल्यावरून खिडकीतून उडी मारली. या घटनेत या रुग्णाचा जागीच मृत्यू झाला असून घटनेची माहिती पोलिसांना मिळताच कोनगाव पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. रुग्णाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे. तर, आत्महत्या करणाऱ्या रुग्णासोबतच त्याचे कुटुंबही कोरोनाबाधित असल्याने याच विलगीकरण केंद्रात उपचार घेत आहे. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, यापूर्वीही मुंबईतील एका रुग्णाने याच इमारतीवरून उडी घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्या घटनेत त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले होते. तर काही दिवसांपूर्वी हत्येच्या गुन्ह्यात असलेला आरोपीही या विलगीकरण केंद्रातील गर्दीचा फायदा घेऊन पळून गेला होता. त्यामुळे या विलगीकरण केंद्राच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details