मीरा भाईंदर(ठाणे)-काशीमीरा पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याचा आज कोरोनावरील उपचार घेत असताना मृत्यू झाला. काशीमीरा लोकल क्राईम ब्रँच युनिटच्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचेही स्पष्ट झाले आहे.पोलिसांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चार कोरोनाबाधित कर्मचाऱ्यापैकी एक कर्मचारी भाईंदर पश्चिमच्या पंडित भीमसेन जोशी कोविड रुग्णालयात उपचार घेत आहे. दोन कर्मचाऱ्यांना ठाण्यातील वेदांत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.एक कर्मचाऱ्याचे त्याच्या घरीच विलगीकरण करून त्यावर उपचार सुरु आहेत. या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची कोविड १९ चाचणी मीरा रोडच्या वोकार्ड इस्तिपळात करण्यात आली होती. तर सोमवारी त्यांचे वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आले.