महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिंता वाढली...पनवेलमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 130 वर - कोरोना

पनवेल महानगरपालिका परिसरातील कोरोनाबाधितींची सख्या 130 वर पोहोचली असून 41 रुग्ण बरे झाले आहेत.

corona
कोरोना

By

Published : May 8, 2020, 10:22 AM IST

नवी मुंबई-पनवेल महानगरपालिका परिसरात गुरुवारी तब्बल कोरोनाचे 17 रुग्ण आढळले असून चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. पनवेलमध्ये आतापर्यंत 130 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 41 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.

पनवेल मध्ये दिवसागणीक कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्रात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी 17 नवे कोरोनाबाधित रुग्ण पनवेल मध्ये आढळले आहेत.

पनवेल मध्ये आज आढळलेले 17 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे रुग्णालय, बससेवा, आयटीक्षेत्र अशा अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या व्यक्ती किंवा त्यांचे निकटवर्तीय यांचाही समावेश आहे. विविध आजारावंरिल उपचार घेण्यासाठी रुग्णालयात गेल्यामुळेही काही जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details