महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बदलापूरात नव्याने 6 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद; कोरोनाबाधितांची संख्या 69 वर - ठाणे कोरोना न्यूज

बदलापूरात नव्याने 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 69 वर पोहोचली आहे. शहरातील 22 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

six corona patient increased
बदलापूरात नव्याने 6 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

By

Published : May 14, 2020, 11:17 AM IST

ठाणे-बदलापूर शहरात नव्याने 6 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याची माहिती कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे रुग्णांचा आकडा 69 वर पोहचला आहे.

बुधवारी शहरात तीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. आज सहा कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बदलापूर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 6 ने वाढून 69 इतकी झाली आहे. 22 रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने यापूर्वी घरी पाठवण्यात आले आहे तर आत्तापर्यंत 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गुरुवारी 14 जणांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे निगेटिव्ह अहवालांची संख्या 156 झाली आहे. 21 जणांचे अहवाल येणे प्रलंबित आहे. गुरुवारी सकाळपर्यंत कोणालाही कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून सोडण्यात आलेले नाही. 23 जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून ते प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येतील. विलगीकरण कक्षात 60 व्यक्तींना ठेवण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details