महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कौतुकास्पद; कोरोनाबाधित चिमुकलीचा पहिला वाढदिवस केला रुग्णालयात साजरा... - ठाणे रुग्णालयात कोरोनाबाधित चिमुकलीचा वाढदिवस

वडिलांना कोरोनाची लागण झाल्यानंतर चिमुकलीलाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या चिमुकलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Corona
वाढदिवस साजरा करताना डॉक्टर

By

Published : May 23, 2020, 8:26 PM IST

नवी मुंबई - नवी मुंबईतील एका रुग्णालयात कोरोनामुळे ठेवण्यात आलेल्या चिमुकलीचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. रुग्णालय प्रशासनाने पुढाकार घेत हा वाढदिवस साजरा केल्याने या रुग्णालयातील डॉक्टरांचे कौतुक होत आहे.

वाढदिवस साजरा करताना डॉक्टर

या चिमुकलीच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर चिमुकलीलाही कोरोनाने झाल्याचे निष्पन्न झाले. तर आईला देखील कोरोना संशयित म्हणून याच रुग्णालयात क्वारंटाइन करून ठेवण्यात आले होते. कोरोनामुळे संपूर्ण कुटुंबच रुग्णालयात असताना आपल्या मुलीचा पहिलाच वाढदिवस कसा साजरा करायचा, असा प्रश्न चिमुकलीच्या आई-वडिलांना पडला होता. चिमुकलीचा पहिला वाढदिवस असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाला समजली.

या चिमुकलीचा वाढदिवस रुग्णालयामध्येच साजरा करण्याचे रुग्णालय प्रशासनाने ठरवले. त्यानुसार डॉक्टर व चिमुकलीच्या आई-वडिलांनी पीपीई कीट परिधान करत केक कापून रुग्णालयातच चिमुकलीचा पहिला वाढदिवस साजरा केला. यावेळी या सर्वांच्याच चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता.

ABOUT THE AUTHOR

...view details