पनवेलमध्ये कोरोना रुग्णसंख्या घटली; मात्र मृत्यूदर वाढला, ४२ दिवसात ३२६ जणांचा मृत्यू - कोरोना पनवेल
पनवेल महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या घटली मात्र मृत्यूदर वाढला असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. रुग्णांनी लक्षणे लपवून ठेवल्याने थेट ऑक्सिजन व व्हेंटिलेटरवर ठेवण्याचे प्रकार या काळात वाढल्याने मृत्यूंची संख्या वाढल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.
नवी मुंबई -दीड वर्षांच्या कोरोनाकाळात पनवेलमध्ये एक हजार कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. या काळात दुसऱ्या लाटेत १ एप्रिलपासून फक्त ४२ दिवसांत ३२६ जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या घटली मात्र मृत्यूदर वाढला असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. रुग्णांनी लक्षणे लपवून ठेवल्याने थेट ऑक्सिजन व व्हेंटिलेटरवर ठेवण्याचे प्रकार या काळात वाढल्याने मृत्यूंची संख्या वाढल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.
४२ दिवसात ३२६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू -
पनवेल पालिका क्षेत्रात आतापर्यंत ५४,३१६ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ५०,७१० रुग्ण बरे झाले, मात्र एक हजार जणांचा मृत्यू झाला. आजही २,६०६ रुग्ण विविध रुग्णालये व घरून उपचार घेत आहेत. दुसऱ्या लाटेत १ एप्रिलपासून फक्त ४२ दिवसांत ३२६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.