महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Corona Free District कोरोनाच्या हॉटस्पॉट ठाणे जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल, आढळले फक्त 'इतके' रुग्ण - डॉक्टर आर्मीची मिळालेली योग्यवेळी साथ

कोरोना बाधित रुग्णांचे सर्वाधिक मृत्यू ठाणे जिल्ह्यात झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र आरोग्य विभागाचे योग्य नियोजन, डॉक्टर आर्मीची मिळालेली योग्यवेळी साथ आणि प्रशासनाच्या प्रयत्नाच्या जोरावर ठाणे जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. ठाण्यात आता गेल्या 10 दिवसात केवळ 11 रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाल्याचा आशावाद आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

Corona Hotspot Thane District
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jan 11, 2023, 8:39 PM IST

ठाणे - कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेला हॉटस्पॉट जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्याची ओळख झाली आहे. मात्र सर्वाधिक हॉटस्पॉट ठरलेल्या या जिल्ह्याची आता कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. गेल्या १० दिवसापासून कोरोना रुग्णसंख्या कधी १ तर कधी शून्य आढळून येत आहे. तर १० जानेवारीला २ नवे कोरोना रुग्ण जिल्ह्यात आढळून आले होते. एकंदरीतच १ जानेवारी ते १० जानेवारी २०२३ पर्यत केवळ ११ रुग्ण आढळून आल्याने ठाणे जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक अशी बाब आहे. त्यामुळे आगामी काळात कोरोनाचे समूळ उच्चाटन होईल, असा आशावाद आरोग्य विभागाकडून व्यक्त केला जात आहे.

या दिवशी आढळून होता पहिला रुग्णमार्च २०२० साली कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर सर्वप्रथम पुणे, मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यात महापालिका क्षेत्रात १३ मार्चला पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. त्यानंतर १४ मार्च रोजी कल्याण आणि नवीमुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाने शिरकाव केला. सुरवातीलाच एकट्या मार्च महिन्यातील १९ दिवसात ३५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली होती. जसा एप्रिल महिना उजाडला तसा या आजाराचा फैलाव अधिक तीव्रतेने होऊ लागला. या महिन्यात एक हजाराच्या आसपास रुग्णसंख्या गेली. त्यावेळी जिल्ह्यात ४९ दिवसातच सुमारे एक हजार दोनशेच्या जवळपास रुग्णांची संख्या गेली. त्यावेळी जिल्ह्यातील नागरिकांसह प्रशासनाच्या पायाखालची जमीन सरकली होती.

महापालिकेची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवरतात्पुरत्या स्वरूपात भरतीकरून आरोग्यसेवा सुरळीत जिल्ह्यातील काही महापालिकेची आरोग्य व्यवस्था आधीच व्हेंटिलेटरवर होती. कोरोना येण्यापूर्वीच्या सामान्य परिस्थिती असल्याने त्यावेळी आरोग्य यंत्रणा तोकडी पडत होती. कोरोनासारख्या महामारीचा सामना करायचा तरी कसा? या विवंचनेत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन होते. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागात हजारो पदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करून आरोग्य सेवा सुरळीत करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.

कोवीडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत हजारो कोवीड रुग्णइतर ठिकाणांप्रमाणे जिल्ह्यातही कोवीडची तिसरी लाट आल्याचे पाहायला मिळाले. त्यापैकी पहिली लाट आणि दुसरी लाट अतिशय भयंकर होती. कोवीडच्या या दोन्ही लाटांमध्ये जिल्ह्यात दररोज हजारो रुग्ण आढळून येते होते. एकाच दिवशी आढळून आलेल्या सर्वाधिक रुग्णांमध्ये पहिल्या लाटेमध्ये दररोज ५०० तर दुसऱ्या लाटेमध्ये हाच आकडा तब्बल २ हजारांवर गेला होता. तर तिसऱ्या लाटेत रुग्णवाढ भरमसाठ असूनही कोरोनाची तितकीशी परिणामकारकता दिसून आली नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ७ लाख ४७ हजार ४१२ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली. तर ७ लाख ३६ हजार १९९ रुग्ण बरे झाले आहे.

डॉक्टर आर्मीने दिली मोलाची साथशासनाची आरोग्य यंत्रणा तोकडी पडणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तत्कालीन पालकमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज संस्थाच्या हद्दीतील खासगी डॉक्टरांना मदतीसाठी साद घातली गेली. आणि इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याण आणि डॉक्टर आर्मीसह जिल्ह्यातील विविध डॉक्टरांच्या संघटनासह शेकडो सामाजिक संघटनानी त्यावेळी कठीण परिस्थितीत मोलाची साथ दिली. त्याच्याच जोडीला जिल्ह्यात अनेक जम्बो कोवीड सेंटर आणि इतर आवश्यक आरोग्य सुविधा उभारल्या. ज्यामुळे कोरोनाच्या दोन्ही लाटांना तेवढ्याच ताकदीने तोंड दिलेले पाहायला मिळाले. विशेष म्हणजे कोवीड काळात केलेल्या चांगल्या कामाची दखल केंद्र सरकारकडूनही घेण्यात आली आणि प्रशासनाला कोवीड इनोव्हेशनचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला होता.

दररोजचे ५ हजार रुग्ण ते रुग्णसंख्या शून्यावरपहिल्या आणि दुसऱ्या कोवीड लाटेत अनेक नागरिकांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले. पहिल्या लाटेमध्ये दररोज २ ते ५ हजार पेक्षा अधिक तर दुसऱ्या लाटेमध्ये त्यापेक्षा किती तरी अधिक कोवीड रुग्ण आढळून आले. मात्र, जिल्ह्यातील विविध शहरातील जम्बो कोवीड सेंटर, खासगी डॉक्टरांची डॉक्टर आर्मी आणि 2 वर्षीपासून सुरू झालेले कोवीड लसीकरण या तिन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम झाला. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात हाताच्या बोटावर मोजता येईल, इतकी रुग्णसंख्या आढळून येत आहे.

सर्वाधिक मृत्यू कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातकोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासून ठाणे जिल्ह्यात ११ हजार ९७१ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये आजपर्यत सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू कल्याण डोंबिवली महापालिका परिसरातील रुग्णांचा झाला असून २ हजार ९६२ मृत्यूची नोंद करण्यात आली. त्या खालोखाल ठाणे महापालिका हद्दीत २ हजार १६४, तर सर्वात कमी ३८९ रुग्णांचा कुळगाव - बदलापूर नगरपरिषद हद्दीत मृत्यूची नोंद झाली आहे. शिवाय ठाणे जिल्ह्यातील एकूण पाच तालुक्यातील ग्रामीण भागातही १ हजार २५७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद जिल्हा आरोग्य विभागात करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details