ठाणे - राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातील अनेक कर्मचार्यांना लागण झाली होती. यापैकी १५ पोलीस अधिकारी व ११० कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
ठाण्यात पोलिसांची कोरोनावर मात; निम्म्यापेक्षा जास्त कर्मचारी पुन्हा कामावर रुजू - Police affected by corona
ठाणे पोलीस आयुक्तालयात आतापर्यंत १९२ जण कोरोनाग्रस्त झाले होते. त्यात १८ पोलीस अधिकारी व १७४ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यापैकी 15 पोलीस अधिकारी व ११० पोलीस कर्मचारी कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत.

तसेच ३ पोलीस अधिकारी आणि ६२ कर्मचारी वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, सर्व पोलिसांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.
कोरोनाचे संक्रमण झालेले अनेक पोलीस बांधव कोरोनाला हरवून सुखरूप परतत आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयात आतापर्यंत १९२ जण कोरोनाग्रस्त झाले होते. त्यात १८ पोलीस अधिकारी व १७४ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. आजारातच कोरोनाची लागण झाल्याने एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. परंतु, आतापर्यंत 15 पोलीस अधिकारी व ११० पोलीस कर्मचारी कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तसेच ३ अधिकारी आणि ६२ कर्मचारी असे एकूण ६५ पोलिसांवर सध्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. सर्व पोलिसांची प्रकृती स्थिर असून ते लवकरच बरे होऊन कर्तव्यावर रुजू होतील. असा विश्वास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.