महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गर्भवती कोरोनाबाधित महिलेला रुग्णालयाने प्रवेश नाकारला; मनसे आक्रमक - mns on pregnant corona positive women

पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेला व तिच्या पाच वर्षांच्या मुलीला या रोगाचे संक्रमण तिच्या पतीकडून झाले. तिचा पती सध्या ठाण्याच्या कोव्हिडसाठी आरक्षित कौशल्या हॉस्पिटलमध्ये गेल्या तीन दिवसांपासून उपचार घेत आहे.

गर्भवती कोरोनाबाधित महिलेला रुग्णालयाने प्रवेश नाकारला; मनसे आक्रमक
गर्भवती कोरोनाबाधित महिलेला रुग्णालयाने प्रवेश नाकारला; मनसे आक्रमक

By

Published : May 15, 2020, 4:28 PM IST

ठाणे - दररोज कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असतानाच एका गर्भवती महिलेला प्रवेश नाकारण्याचा निंदनीय प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेला व तिच्या पाच वर्षांच्या मुलीला या रोगाचे संक्रमण तिच्या पतीकडून झाले. तिचा पती सध्या ठाण्याच्या कोव्हिडसाठी आरक्षित कौशल्या हॉस्पिटलमध्ये गेल्या तीन दिवसांपासून उपचार घेत आहे. त्याने आपल्या पत्नी व मुलीला एकाच हॉस्पिटलमध्ये ठेवण्याची विनंती हॉस्पिटल प्रशासनाला केली. परंतु त्याची ही विनंती फेटाळण्यात आली.

गर्भवती कोरोनाबाधित महिलेला रुग्णालयाने प्रवेश नाकारला; मनसे आक्रमक

'आमच्या इथे गर्भवती महिलेला उपचार देण्यासाठी गायनॅकॉलॉजिस्ट व इतर आवश्यक साधने नसल्याने रिस्क घेऊ शकत नाही. त्यामुळे सदर महिलेला दाखल करून घेण्यास नकार दिला. हॉस्पिटलच्या या अमानवीय वागणुकीचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष तथा स्वामी फाउंडेशनचे संस्थापक महेश कदम यांनी चांगलेच फैलावर घेतले.

ABOUT THE AUTHOR

...view details