रत्नागिरी - जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या 24 तासांत सरासरी जिल्ह्यात 84.12 मिली पावसाची नोंद झाली आहे. दापोली तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला असून 142 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात सकाळपासून संततधार; 84.12 मिमी पावसाची नोंद
जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या 24 तासांत सरासरी 84.12 मिली पावसाची नोंद झाली आहे. तर, दापोली तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला असून 142 मिली पावसाची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला होता. तो अंदाज आता खरा होताना दिसत आहे. रत्नागिरीसह चिपळूण, संगमेश्वर, राजापूर आणि लांजा तालुक्यात दमदार पाऊस पडत आहे. शुक्रवारी रात्री जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळयल्या होत्या त्यानंतर आज सकाळपासून पुन्हा जोरदार पाऊस पडत आहे. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आहे. दक्षिण रत्नागिरी आणि उत्तर रत्नागिरीत सध्या दमदार पाऊस पडत आहे. दरम्यान गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 84.12 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. दापोली तालुक्यात सर्वाधिक पाऊस पाऊस पडला असून 142 मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच, गुहागरमध्ये 110, राजापूरमध्ये 98, चिपळूण 96 मिमी. पावसाची नोंद झाली आहे.