महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दैव बलवत्तर..! पुलाचा कठडा तोडून भरधाव कंटेनर चालकासह खाडीत; चालक बचावला

चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर खारेगाव पुलाचा कठडा तोडून खाडीत पडला. यात चालक जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

spot
spot

By

Published : Aug 3, 2020, 5:38 PM IST

ठाणे- पुलाचा कठडा तोडून खाडीत बुडाल्याची घटना घडली आहे. ही घटना भिवंडी-ठाणे महामार्गावर असणाऱ्या खारेगांव पुलावर घडली आहे. खळबळजनक बाब म्हणजे खाडीच्या पाण्यात पडलेला कंटेनर चालकासह कशेळी पुलापर्यंत पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. रमेश पंडित यादव (वय 47 वर्षे, रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश,) असे मृत्यूच्या दाढेतून बचावलेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे.

कंटेनर चालक रमेश हा इंदूरहून मुंबईच्या दिशेने कंटेनर (एम एच 04 एच वाय 8691) निघाला होता. हा कंटेनर भिवंडीहून न्हावासेवा बंदर येथे आज (दि. 3 ऑगस्ट) सकाळच्या सुमारास जात होता. त्यावेळी भरधाव वेगात जाणाऱ्या अवजड कंटेनरवरून चालकाचा खारेगांव पुलावर अचानक ताबा सुटला. त्यानंतर चालक रमेश हा कंटेनरसह खाडीत पडला. कंटेनर थेट खारेगाव टोलनाक्याजवळ असणाऱ्या खाडीत पडल्याने अपघात झाल्याचे पाहताच कंटेनर चालक रमेशला कशेळी पुलाखाली विश्रांतीसाठी बसलेल्या काही ट्रक चालकाने पाण्यात उड्या घेत त्याला वाचविले आहे. अपघातात जखमी झालेल्या चालक रमेशला ठाणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलीस आणि ठाणे, भिवंडीच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन खाडीच्या पाण्यात वाहून जाणारा कंटेनरला स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने बाहेर काढण्याचे काम सुरु केले.

ABOUT THE AUTHOR

...view details