महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंब्र्यात पुलावरून कंटेनर कोसळला, चालक किरकोळ जखमी - मुंब्रा बायपास रस्त्यावर अपघात

मुंब्र्यातून तळोजाकडे जात असताना हा कंटेनर मुंब्रा येथील बायपास रस्त्यावरून खाली कोसळला. घटनेची माहिती मिळताच ठाणे पालिका आपत्ती व्यवस्थापन पथक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य राबवले. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला.

ठाणे
ठाणे

By

Published : Nov 28, 2020, 4:19 PM IST

ठाणे- मुंब्रा बायपास रस्त्यावरून एक कंटेनर खाली कोसळला, बायपासला लागून खाली अनेक घरे आहेत. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणीही मृत अथवा जखमी झालेले नाही. वाहन चालक मात्र बराचवेळ ट्रकमध्ये अडकलेल्या अवस्थेत होता. घटनस्थळी आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाचे पथक मदत कार्यास पोहचले. या अपघाताची नोंद मुंब्रा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

मुंब्र्यात पुलावरून कंटेनर कोसळला

मुंब्र्यातून तळोजाकडे जात असताना हा कंटेनर मुंब्रा येथील बायपास रस्त्यावरून खाली कोसळला. घटनेची माहिती मिळताच ठाणे पालिका आपत्ती व्यवस्थापन पथक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य राबवले. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला. त्यास त्वरित कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

मुंब्रा बायपास ठरतोय मृत्युचा सापळा

मुंब्र्यामधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि अवजड वाहनांना रस्ता मोकळा करून देण्यासाठी मुंब्रा बायपासची निर्मिती झाली. निर्मितीपासूनच हा रस्ता मृत्यूचा सापळा झाला असून आतापर्यंत शेकडो जीव या रस्त्यावरील अपघातांमध्ये गेलेले आहेत. या बायपासवर असलेले अवघड वळण, हे अपघाताचे कारण ठरत आहे. याठिकाणी योग्य ते बेरीकटिंग करणे आवश्यक असल्याचे स्थानिक सांगत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details